बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
राष्ट्रमाता मॉ साहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त 12 जानेवारी रोजी येथील मुठे ले आऊट मधील रहिवासी गणेश भोसले व सौ. जयंती भोसले यांनी
जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान करुन मॉ साहेब जिजाऊ यांना अभिवादन केले. कोरोना काळाची गरज बघता जिल्हयामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ
शकतो याची जाणीव ठेवत भोसले दांपत्यांनी रक्तदान केले.
सामाजीक कार्यकर्ते गणेश भोसले हे नियमित रक्तदान, आरोग्य शिबीर, गोरगरीब जनतेला त्यांच्या परीने नेहमीच मदत करतात. युवकांनी व्यसनापासुन
दुर राहण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजनाच्या माध्यमातून ते आवाहन करत असतात. यासह नुकताच त्यांना जिल्हा युवापुरस्कार सुध्दा मिळाला. त्याच
पार्श्वभुमीवर युवा दिवस साजरा करत असतांना जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्याहस्ते गणेश भोसले यांचा सत्कार करण्यात आला. भोसले दाम्पत्यांनी यापुढे सामाजीक कार्याची धुरा अशीच सुर ठेवण्याचा निश्चय
त्यांनी व्यक्त केला व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. येणाऱ्या पिढीने सुध्दा काळाची गरज ओळखुन रक्तदान करावे व सामाजीक कार्यात पुढाकार घेऊन
सामाजीक बांधीलकी जोपासावी एवढी माफक अपेक्षा भोसले दाम्पत्यांनी व्यक्त केली.
