दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन * जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचा उपक्रम

दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन 
* जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचा उपक्रम
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी 2022 रोजी या ग्रंथपदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. 
जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे यांच्या हस्ते या ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर कोषागार अधिकारी पंडितराव मांडोगळे होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सध्या मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा सुरु आहे. यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांच्या पुढाकराने वाचकांसाठी दोन दिवसीय ग्रंथप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी या ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता संग्रह, समिक्षण, ऐतिहासीक, पौराणीक यासह स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे विविध वाचन साहित्य या ग्रंथ प्रदर्शनीत उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी दिली. वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक यांचा सदर ग्रंथप्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी विक्रम सोनुने, धनंजय मरे, सय्यद जाकीर, गजानन जोशी यांनी परिश्रम घेतले.