* दोन आरोपी अटकेत : स्थागुशाची कारवाई
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तिन गावठी पिस्तुल विकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याची घटना 8 डिसेंबर रोजी वसाडी ता. संग्रामपूर येथे घडली. यावेळी पोलीसांनी आरोपींकडून गावठी पिस्तुल सोबत सहा जिवंत काडतुस व मोबाईल संच असा एकुण 76,100 रूपयांचा एैवज जप्त केला.
सदर घटनेबाबत अधिक वृत्त असे कि, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी जिल्हयात अवैध शस्त्राविरूध्द कारवाई करण्याचे आदेश स्थागुशाचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते यांना दिले त्यानुसार स्थागुशाचे गिते यांना गोपनिय माहिती मिळाली की, मध्यप्रदेश राज्यातील पाचौरी येथून दोन व्यक्ती गावठी पिस्तुल विक्रीच्या उददेशाने संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथे येत आहेत. या माहितीच्या आधारावर वसाडी येथे स्थागुशाच्या पथकाने सापळा लावला असता सिताराम मोतीराम भिलाले 23 रा.पाचौरी ता.खकणार जिल्हा ब-हाणपूर मध्य प्रदेश व हिरचंद भुवानसिंग भिलाले 22 रा. रा.पाचौरी ता.खकणार जिल्हा ब-हाणपूर मध्य प्रदेश यांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन गावठी पिस्तुल किंमत अंदाजे 75 हजार रूपये, सहा जिवंत काडतुस किंमत 600 रूपये आणि मोबाईल फोन किंमत 500 रूपये आढळून आले. ही कारवाई 8 डिसेंबरच्या रात्री 8.45 वाजता वसाडी येथे करण्यात आली. कारवाईत स्थागुशाचे पथक सहभागी झाले होते.
