बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
येथील जिजामाता महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त सेल्फी विथ स्लोगन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
एडस् या भयावह रोगासंबंधी जनजागृती व्हावी, या हेतुने सेल्फी विथ स्लोगन स्पर्धा घेण्यात आली. प्रा. डॉ. वंदना काकडे यांनी प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाद्वारे आयोजित जनजागृतीपर उपक्रमाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. जिजामाता महाविद्यालयीन बीएससी भाग १, २ व ३ च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदवला. या स्पर्धेत बी एससी भाग ३ ची विद्यार्थीनी निकिता ताठे हिने प्रथम, तर बीएससी भाग २ चा विद्यार्थी आदित्य वाघ याने द्वीतीय तर बी एससी भाग ३ ची विद्यार्थीनी अंजली रगड व प्रेरणा खरात यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्राचार्य कॅप्टन डॉ कोठे यांनी समाजाभिमुख कार्यक्रम आयोजन करण्यासाठी प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ वंदना काकडे, डॉ राजश्री येवले व डॉ अमर शेलेकर यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांनी मिळालेल्या आरोग्यविषयक ज्ञानाचा समाजाला जागरूक करण्यासाठी उपयोग करावा, असे आवाहन डॉ कोठे यांनी केले.
