बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
आजच्या युगात मुलांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंभु होउन स्वतः चा उदयोग सुरू करावा. यासाठी शासन आपल्या सोबत आहे. आपण बाबासाहेबांसारखे निर्भीडपणे जिवन जगावे, जिवनात संघर्ष आला असेल, तर बाबासाहेबांचे संघर्ष करीत यश प्राप्त करून देणारे विचार अंगिकारावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त६ डिसेंबर रोजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतुन उदयोजगता परीचय व कोशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन समाज कल्याण कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील, जात पडताळणी कार्यालयाचे संशोधन अधिकारी मनोज मेरत, सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी, अशोक नारखेडे, संदीप कपले, बार्टी जिल्हा प्रमुख महेंद्र शामदे सह सर्व समतादुत उपस्थित होते .
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व त्यानंतर प्रशिक्षण कार्यशाळेचे उदधाटन करण्यात आले .यावेळी शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह चिखली च्या मुली कु सोनु ढंगारी, नेहा साळवे, अलका लोखंडे, रेणुका उंबरकर, निवासी शाळा कोलवड चे विदयार्थी योगेश जाधव, पर्वत लांडगे, सिध्दांत इगळे, प्रतिक मोरे, शासकिय वसतिगृह बुलडाणा च्या मुली कु दिक्षा मुळे, विभा वानखेडे, काजल इंगळे, स्नेहा पैठणे आदींना जातीचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ अनिता राठोड यांनी उदयोजकता प्राशिक्षणात कार्यालयाचे योगदानबाबत माहिती दिली. जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक सुनिल पाटील यांनी शासनाच्या उदयोगाबदलच्या सर्व योजनांची माहिती दिली. तसेच ऑन लाइन मैत्री पोर्टल, जेम पोर्टलचा कसा वापर करावा हेही सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज मेरत यांनी केले तर संचालन तालुका समन्वयक सतिश बाहेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी बार्टीचे समतादुत मोसिन खान, धम्मदिप म्हस्के, कृष्णा आळंदकर, शुभांगी सरकटे, मीलींद डोगरदिवे यांनी प्रयत्न केले. यावेळी महात्मा फुले समाजकार्य महाविदयालयाचे सर्व शिक्षक, विदयार्थी हजर होते.
