बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
कोरोना या वैश्विक आजारातील तिसरा स्टेन्स समजला जाणारा ओमीक्रोनचे संक्रमन थोपवून त्याच्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणे आवश्यक असल्याचे ओळखून बुलडाणा जिल्हयातील प्रख्यात समाजसेवक अकिल अहेमद यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर 2021 रोजी स्थानिक मिर्झा नगरच्या मन्नू डोंगरे नगरपालिका शाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात केवळ चार तासात तब्बल 100 जणांना कोरोनाची लस देण्यात आली. या शिबिरात तहसीलदार रूपेश खंडारे, नप मु्ख्याधिकारी गणेश पांडे व डॉ. सरपोत, डॉ.सुरवटे यांचे सहकार्य मिळाले. या कार्यक्रमासाठी जमीरभाई, सोहिलभाई, जहिरभाई, अकिलभाई अहेमद, आसिफभाई, शाहरूखभाई, अमजदभाई, मडडाभाई यांनी सहकार्य केले विशेष म्हणजे, बुलडाणा येथील रेशन दुकानदारांनीही या कार्यक्रमासाठी योगदान दिले.
