साखरखेर्डा येथे सुरु असलेले बेमुदत आमरण उपोषण अखेर सुटले

साखरखेर्डा येथे सुरु असलेले बेमुदत आमरण उपोषण अखेर सुटले
 सिंदखेड राजा (एशिया मंच वृत्त : मंगेश राजगुरु) 
    तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा मध्ये शिंदी येथील रहिवाशी निलेश बंगाळे यांनी साखरखेर्डा मध्ये बस स्थानकावर गेल्या १९ नोव्हेंबर पासून विविध मागण्या साठी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते. यामध्ये शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी पैनगंगा सुतगिरणी सुरु करणे, तसेच साखरखेर्डा तालुका निर्मिती करणे, बुलढाणा जिल्हा दारुमुक्त करणे या आणि आदी प्रमुख मागण्यासाठी सदर आमरण उपोषण सुरु होते.
  या उपोषणाची दखल घेत   चिखली मतदार संघाचे माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मधस्थीने सकारात्मक चर्चा करून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात आणि उदयोग मंत्री सुभाषजी देसाई यांनी निलेश बंगाळे यांच्याशी फोनवरून चर्चा साधून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
    साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या माध्यमातून लेखी पत्र देऊन श्री बंगाळे यांना 23 नोव्हेंबर रोजी लिंबू पाणी देऊन उपोषण सोडवले.