* जयश्रीताई शेळके यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
साखळी बु. जि. प. सर्कलमधील शिरपूर ते साखळी बु. रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा जि. प. सदस्य ॲड. जयश्रीताई शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली.
जिल्हा परिषदेच्या साखळी बु. सर्कलमधील शिरपूर ते साखळी बु. रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेले आहे. या रस्त्यावर गट क्र.०१ लगत नदीचे पात्र आहे. या नदीवर पुलाची अत्यंत आवश्यकता आहे. नदीपात्रावर पूल नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यास अडचणी येतात. तसेच नागरिकांना रहदारीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागते. त्यामुळे शेतकरी तसेच नागरीकांना होणारा त्रास कमी करणे गरजेचे आहे. नदीपात्रावर पुलाचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. शिरपूर आणि साखळी बु. ही गावे या रस्त्याने एकमेकांशी जोडलेली आहेत. अंतर्गत रहदारासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. दोन्ही गावातील नागरिकांच्या शेती शेजारी आहेत. त्यामुळे शेतीकामासाठी इकडून तिकडे जावे लागते. रस्ता नदी पात्रातून जात असल्याने पावसाळ्यात खूप अडचणी येतात. पूर असल्यावर रस्ता बंद होतो. परिणामी शेतीची कामे खोळंबतात. नागरिकांची अडचण पाहता पुलाचे बांधकाम तात्काळ मार्गी लावण्याची गरज आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी शिरपूर ते साखळी बु. रस्त्यावरील गट क्र. ०१ लगतच्या नदी पात्रावर पूल बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
