शाहू परिवाराने आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी* कुवरदेव येथील महिलांना साड्या व फराळाचे वाटप

शाहू परिवाराने आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी
* कुवरदेव येथील महिलांना साड्या व फराळाचे वाटप
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      दरवर्षीप्रमाणे यंदाही राजर्षी शाहू परिवाराच्या वतीने जळगाव जामोद तालुक्यातील कुवरदेव गावातील अदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. महिलांना साड्या व फराळाचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.
      कुवरदेव हे गाव मध्यप्रदेशच्या सिमेवर वसलेले आहे. निसर्गाने नटलेल्या या गावाला कुवरदेव राजाचा वारसा लाभलेला आहे. गावातील आदिवासी बांधव शेती, मजुरी करुन प्रपंच चालवतात. शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके दरवर्षी कुवरदेव येथील आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. यावर्षीही त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. महिलांना साड्या व फराळ वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित केला. 
     याप्रसंगी सरपंच सुलोचनाताई मोरे, कडूभाऊ मोरे, ईश्वर चव्हाण, सावित्रीबाई मोरे, मनोज वाघ, विजय वाघ, रमेश ताडे, शैलेश काकडे, शरद मोहिते, नुतूनताई वाघ, प्रतिभाताई पवार, गजानन अवचार, प्रकाश हातेकर, संतोष बावस्कर, दीपक महाराज, गणेश काकडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भविष्यात विविध उपक्रम राबविणार : येणाऱ्या काळात शाहू परिवार कुवरदेव गावासाठी विविध उपक्रम राबविणार आहे. महिलांसाठी आरोग्य तपासणी, मुलींच्या शिक्षणासाठी मोफत अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. गावातील लोकांची आर्थिक क्षमता वाढावी याकरिता बचतगटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य व उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध केली जाणार आहे. कुवरदेव राजाचा वारसा लाभलेल्या कुवरदेव गावाला विकासाच्या प्रवाहात आणून चेहरामोहरा बदलणार असल्याचे संदीपदादा शेळके यांनी सांगितले.