धारदार शस्त्राने दुकान मालकाचा खून* चिखली शहरातील घटना

धारदार शस्त्राने दुकान मालकाचा खून
* चिखली शहरातील घटना
चिखली : (एशिया मंच वृत्त)
धारदार शस्त्राने वार करून सशस्त्र दरोडा टाकून आनंद इलेक्ट्रॉनिक दुकान मालकाचा अज्ञात दरोडे खोरांनी केलेल्या हल्ल्यात दुकान मालक ठार झाल्याची घटना बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली शहरा मध्ये मंगळवारी 16 नोव्हेंबर च्या रात्री 9.45 वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे चिखली शहरात एकच खळबळ उडाली. 
     घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की,  चिखली शहरातील स्थानिक जयस्तंभ चौकातील आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट  मंगलवारी रात्री 9.45 च्या सुमारास त्यांनी आपली दुकानाचा मुख्य शटर बंद करून बाजूचा लहान शटर आर्धा उघडा ठेवला होता, यादरम्यान तीन अज्ञात दरोडेखोर एका दुचाकीवर आले. त्यातील दोन जण ग्राहक बनून दुकानाच्या आत गेले. त्या दरोडेखोरांनी दुकान मालक कमलेश पोपट वय 55 वर्ष  यांच्यावर धारदार शस्राने हल्ला करुण रोख रक्कम लुटून पसार झाले. जखमी अवस्थेत कमलेश पोपट यांना चिखलीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या  घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पुलिस पथक श्वान  पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे बळीराम गीते चिखली चे ठाणेदार अशोक लांडे हे घटनास्थळी पोहोचून घटनेचे गांभीर्य घेऊन सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहेत.