* गेल्या तिन दिवसांपासूनच्या विस्कळीत सेवेने ग्राहक हैराण
* बिएसएनएलचे अधिकारी सायलेंट मोडवर
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
सरकारव्दारा संचालित व नियंत्रीत असलेल्या दूरसंचार निगम अर्थात बिसएनएलची सेवा बुलडाणा जिल्हावासीयांसाठी फारमोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. वारंवार सेवा खंडित होणे, अधिकाऱ्याना फोन केल्यास ग्राहकांना समाधानकारक उत्तर न देता फोन साईलेंट मोडवर ठेवणे यासह अनेक प्रकारचा त्रास ग्राहकांना बिएसएनएल प्रशासनाकडून सहन करावा लागत असल्याने ग्राहकांचा बिएसएनएलवरील विश्वास उडत असून त्यांचा कल सहाजिकचं खासगी सेवेकडे वळत आहे. यामुळे बिएसएनएलच्या अधिका-यांनाचं या विभागाला खासगीकरणाच्या गर्तेत लोटायचे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा जिल्हयात बिएसएनएलची सेवा कमालीची विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या सेवेवर विसंबुन असलेले अनेक व्यवहार खोळंबले आहेत. वर्क फॉर होम, शासकिय योजनाचे ऑन लाईन कामकाज, मुलांचे ऑनलाईन शिक्षण यासारखे अनेक कार्य जवळपास ठप्प झाले असल्याने जनतेत बिएसएनएलच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. यावर कळस म्हणजे, या सेवेला नियंत्रीत करण्याची जबाबदारी ज्या अधिका-यांवर शासनाने सोपविली आहे ते अधिकारीचं ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात कुचराई करीत असल्याचे धक्कादायक चित्र पुढे येत आहे. याकडे संबंधितांनी गंभीरतेने लक्ष दयावे, अशी मागणी होत आहे.
