* रजा ॲकॅडमीचे पत्रकार परिषदेत माहिती
* शुक्रवार 12 नोव्हेंबरला बुलडाणा बंदची मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
त्रिपुरा राज्यतील अल्पसंख्याक मुस्लिम समुदायावर आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्याचे निषेधार्थ 12 नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्याची अपिल करत दंगली घडविणाऱ्या समाज कंटकावर कायदेशीर कार्रवाई करण्याकरिता उच्चस्तरीय न्यायालीन समिती गठीत करण्याची मागणी रजा ॲकॅडमी आणि तहफ्फुजे नामुसे रिसालत बोर्ड बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने आज 10 नोव्हेंबर रोजी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.
रजा ॲकॅडमी व तहफ्फुजे नामुसे रिसालत बोर्ड बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत रजा ॲकॅडमीचे पदाधिकाऱ्यानी उपरोक्त मागणी केली. पुढे बोलतांना रजा ॲकॅडमीचे पदाधिकाऱ्यानी वास्तव्य मांडत सागितले की, गेल्या दहा, बारा दिवसापासुन त्रिपुरा येथील मुस्लिम अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार सुरू आहे. हे सर्व भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेच्या मूळ भावनेच्या विरोधात असून देश आणि समाजाला तोडण्याचे कृत्य आहे. त्रिपुरातील सुरू अत्याचारामुळे अल्पसंख्याक समाज दहशतीखाली आहेे. मात्र तिथले सरकार आणि प्रशासनाकडुन दंगली रोखण्यासाठी कोणतीही योग्य कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप ही रजा एकॉडमीच्या वतीने करण्यात आला आहे. त्रिपुरा राज्यातले मुस्लिमांचे घरे, प्रार्थनास्थळे, त्यांचे जीवनावश्याक आणि मालमत्ता विशेषत त्यांचे पवित्र ग्रंथ कुरआन शरिफची अव्हेलना करीत जाळपोळ करण्यात आली. हे खेदजनक आणि निषेधार्ह आहे. गेल्या 10 ते 12 दिवसापासुन त्रिपुरातील विविध भागांत उपद्रवी घटकांनी मुस्लिम अल्पसंख्याकांना धमकावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. मशिदींवर हल्ले करून त्यांच्या संघटनांचे झेंडे मशिदीच्या मिनारांवर लावले गेले. त्रिपुरा येथील सुरू असलेल्या दंगलीमुळे देशभरातील मुस्लिम समाजामध्ये असंतुष्टीचे वातावरण पसरलेले आहे. मुस्लिम समुदायाची भावनेचा सन्मान करून तत्काळ सदर दंगलीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय न्यायालीन समिती गठीत करावी, दंगलीत मृत पावलेल्याच्या नातेवाईकांना प्रत्येक 50 लक्ष व घरातील एका व्यक्तिला सरकारी नौकरी, ज्यांचे घरांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई म्हणुन प्रत्येकी 5 लक्ष रूपये व क्षतिग्रस्त मशीदेचे सौंदर्यकरणासाठी 10 लक्ष रूपयाची मदत देण्यात यावी, अशी मागणी रजा एकॉडमीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी रजा एकॉडमीचे जिल्हा अध्यक्ष सिकंदर रजा, काझी रईस, हाफिज इंतेसाम हुसैन, इम्रान खान, मसर्रत रजा, कलीम रजा, हाफिज कमरुज्जमा, सय्यद समीर, युसूफ भाई आदी उपस्तीत होते.
