बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मासरुळ जि. प. सर्कलमधील सातगाव ता. बुलडाणा येथील अंबाबाई देवी मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमीपुजन जालिंधर बुधवत शिवसेना जिल्हा प्रमुख बुलडाणा यांच्या हस्ते आज २२ ऑक्टोंबर २०२१ रोजी संपन्न झाले. याप्रसंगी सातगाव गावाच्या लगत असलेल्या धामना नदीला पावसाळयात पूर येऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. जिल्हा नियोजन समितीमध्ये जालिंधर बुधवत यांनी सातगाव येथील धामना नदीला पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. संबंधित विभागाने संरक्षण भिंतीच्या जागेची पाहणी करून अंदाजपत्रके जिल्हाधिकारी कार्यलयात अतींम मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती यावेळी जालिंधर बुधवत यांनी उपस्थितांना सांगितली. तसेच स्मशानभूमी वॉलकंपाउंड, सातगाव फाटा ते सातगाव गावापर्यंतच्या रस्ता मंजूर झाला असून त्याची अंदाजपत्रकेही अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात असून लवकरच ही कामे मार्गी लागणार असल्याचे यावेळी जालिंधर बुधवत यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी ता. प्रमुख लखन गाडेकर, दादाराव महाले, उपता. प्रमुख अमोल शिंदे, समाधान बुधवत , रवी गोरे, किशोर कानडजे उपसरपंच कुलमखेड, बबलू वाघूर्डे, अनिल कुटे, दिनेश काळे, युवासेनेचे अनिल कानडजे, संदीप पालकर, सरपंच निलेश देठे, ग्रा. पं. गणेश पालकर, नंदू शिंदे, राजू पालकर, रामेश्वर शिंदे, सोपान राजपूत, योग पालकर, स्वप्नील साखळे, मंगेश गिरी, अर्जुन कानडजे, पांढरी पालकर, संदीप पालकर पोलीस पाटील, शिवाजी घोरपडे, रामराव घोरपडे, विजय राजपूत, विठ्ठल पालकर, दिनेश पालकर, नामदेव घोरपडे, गणेश शिंदे, अमोल इंगळे, विकास पालकर, प्रवीण जैन , भारत पालकर, समाधान पालकर, सुनील पालकर, राजू पालकर, अनिल राजपूत, रामचंद्र पालकर, मारोती शिंदे, पांडुरंग घोरपडे, गजानन पालकर, अमोल मुजमुळे, प्रदीप रत्नपारखी, प्रकाश पालकर, निखिल शिंदे, परशराम बावस्कर, अनिल शिंदे, भक्तराज जैन, हिवाळे काका, तान्हाजी पालकर, विजय शिंदे, शंकर मुजमुले, शांताराम रत्नपारखी, महादु रत्नपारखी पुरुषोत्तम शिंदे, कृष्णा राजपूत, अनिल ताठे, अनिल शिंदे, रामू पालकर, जगन मुजमुले, एकनाथ पालकर, अशोक पालकर, किसन रत्नपारखी, सुनील हिवाळे यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
