* बुलडाण्याच्या उज्वल ओळेकरचा समावेश
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जमशेदपुर (झारखंड) येथे पार पडलेल्या 40 व्या सिनिअर राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला रौप्य पदक प्राप्त केले. अंतिम फेरीत हरिणायांच्या संघाने महाराष्ट्राच्याा संघाचा 6-2 गुणांनी पराभव केल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या संघाचे बुलडाण्याच्या उज्वल ओळेकरने प्रतिनिधित्व केले.
राष्ट्रीय तिरंदाजी असोसिएशनच्या वतीने दि. 1 ते 10 ऑक्टोंबर दरम्यान 40 व्या सिनिअर राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धा जमशेदपुर (झारखंड) येथे पार पडल्या. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्ण पदकासाठी हरिणाना व महाराष्ट्र संघात तुल्यबळ लढत झाली. शेवटी हरियाना संघाने महाराष्ट्र संघाचा 6-2 गुणांनी पराभव केला. हरिणायाना संघाला सुवर्ण पदक तर महाराष्ट्र संघाला रौप्य पदक प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या संघात पांर्थ सांळुुके (सातारा), उज्वल ओळेकर (बुलडाणा), ओम विटलकार (अमरावती), यशदिप भोगे(अमरावती) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून गणेश विश्वकर्मा हे होते. उज्वल भरत ओळेकर बुलडाणा येथील प्रबोधन विद्यालयाचा विद्यार्थी असून चंद्रकात इलग यांच्या द्रोणाचार्य अॅकेडमी मध्ये प्रशिक्षण घेतो. चिकाटी, मेहनत व एकाग्रतेच्या आधारावर हे यश प्राप्त केल्याचे त्याने सांगितले. भविष्यात अांतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त करण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली.
