बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या बुलडाणा येथील मुख्यालयात जयंती साजरी करण्यात आली.
राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीप दादा शेळके, अध्यक्षा सौ. मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच बालदिनानिमित्त त्यांच्या बालप्रेमी विचारांचे व देशाच्या जडणघडणीतील योगदानाचे स्मरण करण्यात आले.
याप्रसंगी रावसाहेब सगट, जितेंद्र वैद्य, गोपाल तायडे, संस्थेचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, सुशील गुळवे, सुभाष बुंधे, पवन सावळे, प्रीती सावळे मॅडम, मंगेश भोंडे, निखिल शिंबरे यांच्यासह संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते..!
