* संदीपदादा शेळके व मालतीताई शेळके यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
खातेदारांचे भविष्य सुरक्षित राहावे आणि त्यांच्या कुटुंबाला संकटाच्या काळात आर्थिक आधार मिळावा, या सामाजिक बांधिलकीतून राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. यांच्या वतीने खातेदारांसाठी अपघाती विमा संरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या उपक्रमांतर्गत संस्थेच्या पाच दिवंगत खातेदारांच्या वारसदारांना एकूण ५ लाख ५० हजार रुपयांच्या विमा धनादेशांचे वितरण करण्यात आले.
राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संदीप दादा शेळके व संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या हस्ते हे धनादेश संबंधित वारसदारांना सुपूर्द करण्यात आले.
यामध्ये मोताळा शाखेतील कै. शिवदास समाधान कांडेलकर यांच्या पत्नी सांगिता शिवदास कांडेलकर, शेलापूर शाखेतील कै. सुरेश जनार्धन भोपळे यांच्या पत्नी सखुबाई सुरेश भोपळे आणि मलकापूर शाखेतील कै. प्रमोद भागवत वानरे यांच्या पत्नी मुक्ताबाई प्रमोद वानरे यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
रोहिणखेड शाखेतील कै. प्रकाश गोपाल आवटे यांच्या पत्नी संगीता प्रकाश आवटे व मुलगा यश प्रकाश आवटे यांना एक लाख २५ हजार रुपये, तर उदयनगर शाखेतील कै. प्रकाश बळीराम वानखेडे यांच्या पत्नी बबिता प्रकाश वानखेडे यांना एक लाख २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
अशा प्रकारे पाच दिवंगत खातेदारांच्या कुटुंबीयांना एकूण पाच लाख ५० हजार रुपयांचे विमा धनादेश वितरित करण्यात आले. खातेदारांच्या कुटुंबीयांना कठीण प्रसंगी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम संस्थेची सामाजिक बांधिलकी आणि ग्राहकांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित करणारा आहे.
यावेळी संस्थेचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, कर्ज अधीक्षक सुभाष बुंधे, आस्थापना अधिकारी पवन सावळे, विमा विभागाचे अक्षय इंगळे, शाखा व्यवस्थापक अमोल सुसर व निखिल शिंबरे उपस्थित होते.
