बुलढाणा आरटीओ कार्यालयाच्या कामकाजाचा प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी घेतला आढावा
* महसूल उद्दिष्टपूर्ती, रस्ता सुरक्षा आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यावर भर; उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांच्याकडून स्वागत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी भेट देऊन कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
या भेटी दरम्यान रवींद्र भुयार यांनी कार्यालयातील विविध विभागांच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली. तसेच महसूल उद्दिष्ट, त्याची पूर्तता आणि रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमांचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.
महसूल उद्दिष्ट निश्चित करून त्याची प्रभावीपणे पूर्तता करण्यासोबतच कार्यालयीन कामकाजात कार्यक्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना अधिक चांगल्या प्रशासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कामकाजात सातत्याने सुधारणा करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
* रस्ता सुरक्षा उपाययोजनांवर विशेष भर
रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने वाहनांची प्रभावी तपासणी, वाहतूक नियमांचे पालन आणि जनजागृती उपक्रम अधिक व्यापक करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपघातप्रवण ठिकाणे ओळखून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रस्ते अपघातांची संख्या आणि अपघातांमधील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व सातत्यपूर्ण कार्यवाही करावी, असे निर्देश प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी दिले.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीर बिलावर, मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार, सतेश तुले, मंदार टवलारकर, हेमंत गावंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निखिल ठाकूर, राजश्री चौधरी, राधिका चव्हाण, दीपाली सपकाळ, कार्यालयीन अधीक्षक तनपुरे, वरिष्ठ लिपिक करण गुट्टे, तुकाराम थोरवे, पुसनाके, श्रीपागोरे, माहुलकर, पन्नालाल राजपूत, पुणकर यांच्यासह कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महसूल उद्दिष्टपूर्ती, रस्ता सुरक्षा आणि नागरिकाभिमुख प्रशासकीय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यालयीन कामकाजात सातत्याने सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
