जी चॅम्प अबॅकसच्या संचालिका सोनम नवगिरे यांना ‘इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’

जी चॅम्प अबॅकसच्या संचालिका सोनम नवगिरे यांना ‘इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’
* आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते सन्मान; यापूर्वी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड’ने गौरव
छत्रपती संभाजीनगर : (एशिया मंच न्यूज )
          जी चॅम्प अबॅकस, देवळाई रोड, छत्रपती संभाजीनगरच्या संचालिका सौ. सोनम अमोल नवगिरे यांना ‘इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ या सन्मानाने गौरविण्यात आले. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी एक्स्प्रेस इन हेरिटेज येथे जी चॅम्प अबॅकसच्या वतीने आयोजित ‘ॲडव्हान्स्ड मार्केटिंग कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमात आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते त्यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
        अबॅकस प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास करण्यासाठी सौ. सोनम नवगिरे सातत्याने कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासोबतच व्यावसायिक क्षेत्रातही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
यापूर्वी ५ मार्च २०२६ रोजी नाशिक येथे अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते सौ. नवगिरे यांना ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला होता. तसेच ३१ मे २०२६ रोजी हैदराबाद येथे त्यांना ‘इंटरनॅशनल अबॅकस टीचर अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते.
       आता ‘इंटरनॅशनल सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स’ मिळाल्याने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.