* जुनी पेन्शन व टप्पा अनुदान लागू होत नाही तोपर्यंत आमदारकीचा लाभ घेणार नाही!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शासनातील आणि विधिमंडळातील सर्व सदस्य पेन्शन घेत असतील तर कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारण्याचा कोणताही नैतिक अधिकार आहे. सोबत शाळांना शंभर टक्के टप्पा अनुदान मिळालेलं नाही. त्यामुळे शिक्षक देखील आर्थिक अडचणी मध्ये आहे .
शिक्षक बांधवांनी सहकार्य केल्यास आणि निवडून आल्यास जुनी पेन्शन योजना व नैसर्गिक वाढीनुसार शंभर टक्के टप्पा अनुदान लागू होत
नाही तो पर्यंत आमदारकीचा कुठलाही लाभ घेणार नाही, अशी प्रतिज्ञा प्रा. डी. एस. लहाने यांनी केली. शिक्षक भगिनींच्या रक्षाबंधन सोहळ्यात ते बोलत होते.
बुलढाणा येथील ओंकार लॉन्स येथे प्राध्यापक लहाने सरांच्या संकल्पनेतून 31 ऑगस्ट रोजी शिक्षक भगिनींचे रक्षाबंधन पार पडले. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, सामाजिक कार्यकर्ते शाहिनाताई पठाण , गजानन धांडे, पत्रकार सुरेखाताई सावळे, प्रज्ञा लांजेवार, मनिषा वारे,अनिता कापरे, आलेल्या बहुसंख्य शिक्षक भगिनीची मोठी उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना ते म्हणाले,
शिक्षक मतदार संघासाठी मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. शिक्षकांच्या समस्या मला पूर्णतः माहीत आहे. मी स्वतः शिक्षकी काम केले आहे. शिक्षण क्षेत्रात विविध समस्या आहेत. असैक्षणिक कामाचं बोजा शिक्षकांवरती लादलेला आहे. संच मानवी वेगळे नियम लावून शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. दरवर्षी शेकडो शाळा बंद पडत आहे. जुनी पेन्शन योजना व नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान हे तर शिक्षकांच्या हक्काचे आहे. शाळेवरती काम करणाऱ्या शिक्षकांना तसेच तासिका तत्वावर लागलेल्या प्राध्यापकांना अत्यंत कमी पगारावर काम करावे लागत आहे. त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही.प्रत्येक नागरिकाला शिक्षा आणि स्वास्थ्य देण्याची जबाबदारी शासनाची आहे. या शिक्षकांना किमान वेतना सोबत वैद्यकीय सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे आपण सर्व लोकांनी सहकार्य केल्यास अर्थात हा जर तर चा भाग असला तरी विजयी झालो तर आमदारकीचा कुठलाही लाभ जुनी पेन्शन , टप्पा अनुदान लागू होईपर्यंत घेणार नाही. असे त्यांनी जाहीर केले. शिक्षकांचा आवाज म्हणून मी भवनांमध्ये कार्यरत राहील असा विश्वास त्यांनी दिला.
* बहिणींचा निर्धार, भावाच्या पाठीशी खंबीर
'शिक्षकांचा सन्मान, शिक्षणाचा अभिमान' या संकल्पनेतून महिला शिक्षक भगिनींचे रक्षाबंधन लहाने सरांनी घडवून आणले. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधून भावाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे प्रा. लहाने सर यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालने उपलब्ध करून दिली आहेत, तर अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या आहेत.हे कार्य राजकारणा पलीकडचे आहे. शिक्षकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सतत लढा देण्यासोबतच, मानस फाउंडेशन च्या माध्यमातून ते संपूर्ण राज्यभरात विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि एकल महिलांच्या हक्क व सन्मानासाठी सामाजिक चळवळ राबवत आहेत. याच सामाजिक बांधिलकीतून बुलढाण्यात दरवर्षी रक्षाबंधन होत असते.आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात तालुक्यातील विविध शाळांमधील महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.राजकारण पलीकडे जाऊन बहिणीसाठी लढणारा हक्काचा भाऊ अशी प्रतिमा असलेल्या लहाने सरांसाठी बहिणी भावाच्या पाठीशी खंबीर उभ्या आहे, असे चित्र यावेळी दिसले.
