शेतकरी संवाद मेळाव्यात् कृषी समृद्धीचा मंत्र* आर्थिक विकासाला चालना हे 'अभिताचे' मुख्य उद्दिष्ट : सुनील शेळके

शेतकरी संवाद मेळाव्यात् 
 कृषी समृद्धीचा मंत्र
* आर्थिक विकासाला चालना हे 'अभिताचे' मुख्य उद्दिष्ट : सुनील शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       कृषी समृद्धीचा मंत्र देत काल मोताळ्यात शेतकरी संवाद मेळावा पार पडला. पशुधनाची उपयुक्तता ,गुणवत्ता पूर्ण चारा व्यवस्थापन, दुधाळ जनावरांसाठी पोषण आहार यावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतीला पशुसंवर्धनाची जोड व आधुनिकतेची कास धरल्यास समृद्धीचा मार्ग मिळू शकतो. पशुपालकांच्या ज्ञानात भर घालण्याबरोबरच आर्थिक विकासाला चालना देणे हे अभिता ऍग्रोचे  उद्दिष्ट असल्याचे कंपनीचे सीईओ सुनील शेळके यावेळी म्हणाले.

पशु आहाराचे महत्व, पशु विमा, पशु तंत्रज्ञान, शासनाच्या योजना यावर उद्बोधन करण्यासाठी,  अभिता ॲग्रोच्या वतीने  30 ऑगस्ट रोजी पशुपालक मार्गदर्शन शिबिर मोताळा येथे घेण्यात आले. ज्यात परिसरातील बहुसंख्य कृषक उत्साहात सहभागी झाले.

         यावेळी पशुसंवर्धन विभाग, मोताळा येथील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ.सोमनाथ ननावरे उपस्थित होते. तसेच युनायटेड इंडिया इन्शुरन्सचे शाखा प्रबंधक सचिन जपूळकर यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. अभिता ऍग्रो प्रामुख्याने उच्च दर्जाचे संतुलित पशुखाद्य आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स निर्मितीद्वारे पशुपालकांचे उत्पन्न वाढवण्याचे आणि पशुधनाचे आरोग्य सुधारण्याचे महत्वाचे कार्य करत आहे. पशुपालकांना केंद्रस्थानी ठेवून दर्जेदार आणि पोषक, पशुखाद्याचा पुरवठा, विविध प्रकारचे पौष्टिक पशुखाद्य बाजारात आणत असून, जे पशुधनाला योग्य पोषण पुरवत आहे. गायी आणि म्हशींसाठी विशेष फॉर्म्युला असलेले सुग्रास, सरकी ,ढेप या सारखे खाद्यामुळे दुधाची गुणवत्ता वाढते, शिवाय पशुखाद्यामध्ये दर्जेदार घटकांचा वापर केल्यामुळे जनावरांची पचनशक्ती देखील चांगली राहते. नेमकी ही बाब डोळ्यापुढे ठेवून खाद्य निर्मिती केली जात आहे.

* ग्रामीण भागात वितरक बनण्याची संधी : 

       पौष्टिक आणि खनिजयुक्त घटकांमुळे जनावरांची हंगामी आजारांशी लढण्याची क्षमता वाढते आणि एकूणच आरोग्य सुधारते.पोषक आहारामुळे दुभत्या जनावरांमध्ये वेळेवर गाभण राहण्याचे प्रमाण सुधारते, या बद्दल महत्वाची माहिती देण्यात आली.ग्रामीण भागातील तरुणांना आणि व्यावसायिकांना पशू आहाराचे वितरक बनण्याची संधी अभिता ऍग्रो ठरू शकते. अभिता पशुपालकांना फक्त चारा नाही, तर योग्य पोषण"l देत असून दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर बनवीण्यास मोलाची मदत करत आहे.