* जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागणीवजा इशाराचे निवेदन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मायबाप शेतकऱ्यांच्या समोरील संकटांची मालिका संपत नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे नुसती आश्वासनांची खैरात राज्य सरकार देत असताना दुसरीकडे निसर्ग देखील शेतकऱ्यांवर कोपला आहे. जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प व अनियमित पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका, उडीद,ज्वारी, व इतर पिके करपली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालसमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारच लक्ष वेधले.
शेतकऱ्यांनी पिकांच्या लागवडीसाठी बियाणे, खते, कीटकनाशके तसेच मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. आधीच लागवड खर्च वाढलेला आहे. मात्र, पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे संकटात सापडला असून, शासनाच्या तातडीच्या मदतीची गरज आहे.
शासनाने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून पंचनामे करावेत व कोणतीही अट न ठेवता सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी या मागणीसह प्रलंबित कर्जमाफीच्या दुसऱ्या याद्या जाहीर करण्यात याव्यात. पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी. यावर्षीचा पीक विमा ताबडतोब वितरित करण्यात यावा. लोड शेडिंग बंद करून पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी मुबलक वीजपुरवठा, डीपीची उपलब्धता, विद्यार्थ्यांना फी माफी तसेच ई-पिक पाहणी तातडीने पूर्ण करावी सोबत पशुधनासाठी चारा छावण्यांचा विचार अग्रक्रमाने व्हावा. सध्याच्या वाढत्या महागाईच्या आणि शेतीच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत अपुरी ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर अधिक आर्थिक आधार मिळावा यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची रक्कम वाढविण्याबाबत केंद्र शासनाकडे ठोस शिफारस करण्यात यावी.
अशी देखील मागणी करण्यात आली. या मागणीच्या अनुषंगाने तात्काळ निर्णय शासनाने घ्यावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, लखन गाडेकर, (उपजिल्हाप्रमुख), सुनील घाटे, गजानन उबरहंडे (किसानसेना उपजिल्हाप्रमुख), विजय इतवारे (तालुकाप्रमुख), विजय इंगळे (तालुकाप्रमुख), गणेश रिंढे, सुनील भाग्यवंत, विजय राऊत (शहरप्रमुख), डॉ. अरुण पोफळे, संजय शिंदे, रामशंकर सोनूने , रविंद्र पवार, संजय गवळी , शा. रफिक श. करीम , बळीराम जाधव , अनिल सुरडकर , राहुल जाधव , सुनिल टेकाळे, शालिग्राम सोनुने, विजय पाटील, शेषराव सावळे, अब्दुल्ला पठाण, विजय सोनोने, समीर खाटीक, रामेश्वर शिंदे, राजू बोरसे, शेषराव सावळे, शेषराव बुधवत, शाम सावळे, शांतीनाथ अपार, श्रावण बोरकर, रविंद्र गोरे, संतोष राजपुत, विश्वनाथ गरड, विलास राऊत, सतीश देवकर, श्रीकांत जाधव, गजानन गवई, गजानन बोडखे, दीपक गुळवे, कृष्णा सिनकर, अविनाश मघाडे, बबन चिकटे, प्रभाकर माघाडे, प्रवीण खरात, बबन खरे, अनिल बेंडे, अनिल राजपूत, मुख्तार शाह गुलाब शाह, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिता जाधव, महिला आघाडी उपतालुकाप्रमुख भावना पाटील, स्मिता वराडे, रोशनी गरड, स्वाती लोंढेकर, सुनिता दराखे, वैशाली मिसाळ, सविता राऊत, रुपाली चव्हाण, शारदा दाभाडे, पुजा शिंगणे, सुनिता सुरडकर, बेबी परिहार, भारती डागोर, सुरेखा कदम, निता चव्हाण, यशोदा देशमुख, वंदना मेढे, ज्योती गायकवाड, रुक्मिणी सिरसाठ यांचे सह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
