देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा जिल्हा क्रीडा संकुल येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
१९ वर्षे वयोगटात अरुण गंगाराम शिवरकर व कु. मयुरी बाबुराव थिटे, तर १७ वर्षे वयोगटात राघव कैलास झोरे व मिलिंद बाबुराव शिवरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या यशाबद्दल मुख्याध्यापक आर. बी. कोल्हे , उपमुख्याध्यापक डी. व्ही. जाधव व क्रीडा मार्गदर्शक मुळे यांनी विजेत्या खेळाडूंना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
