सुनील शेळके यांनी केला जालिंधर बुधवत यांचा सत्कार* जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा

सुनील शेळके यांनी केला जालिंधर बुधवत यांचा सत्कार
* जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दिल्या शुभेच्छा 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांची जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. याबद्दल अभिता कंपनीचे सीईओ तथा माजी उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले.

       शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या नेतृत्वाची शेतकऱ्यांच्या बँकेवर संचालकपदी निवड सुनील शेळके यांनी आनंद व्यक्त केला. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या हातून उत्तम कार्य घडो, अशी सदेच्छा व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.