बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालक पदावर अविरोध निवड झाल्यानंतर सहकार महर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब अर्थात मोठ्या साहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक होत आज जालिंदर बुधवत यांनी अभिवादन केले.यावेळी जिल्हा समन्यवक गजानन धांडे, किसानसेना उपजिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, बुलढाणा तालुका प्रमुख विजय इतवारे, किरण दराडे उपस्थित होते.
शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जालिंदर बुधवत यांची उमेदवारी सहकार पॅनलच्या वतीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी घोषित झाली होती. ११ ऑगस्ट रोजी नामांकन अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या सोबतच्या नऊ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने जालिंदर बुधवत यांची जिल्हा बँकेच्या संचालक पदावर अविरोध निवड झाली. त्यामुळे "कामाचा माणूस" जिल्हा बँकेत गेल्याच्या भावना निर्माण झाल्या आहेत. आज सहकारमहर्षी स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे साहेब यांच्या चिखली रोडवरील स्मृतीस्थळी जाऊन जालिंदर बुधवत यांनी अभिवादन केले.
