आदिवासिंचा क्रांति-स्वातंत्र्यदिन जल्लोष

आदिवासिंचा क्रांति-स्वातंत्र्यदिन जल्लोष 
केनवड : (एशिया मंच न्यूज )
       येथील ओम नमः शिवाय विश्व आदिवासी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विध्यार्थ्यांनी 9 ऑगस्ट क्रांतिदिना पासून सुरुवात करून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा केला जात आहे.
         श्री ज्ञानेश्वर आदिवासी, मागासवर्गीय शिक्षण मंडळ केनवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथजी शेवाळे, सचिव दिपक शेवाळे, व्यवस्थापक विष्णू बाजड, मुख्याध्यापक अरुणकुमार गोळे, पदवीधर शिक्षक रुपेश अभ्यंकर, अधीक्षक प्रकाश अवताडे, अधिक्षिका प्रणिता अंभोरे यांच्या मार्गदर्शनात क्रांतिदिनी सकाळी गावात 2 की. मी. पायी प्रभातफेरी काढण्यात आली.                देशभक्ती, राष्ट्रभक्ती, महापुरुष यांच्या जयघोष करीत गावाकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आठवडी बाजारात रॅली पोहचली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करून रॅली शाळेत दाखल झाली.
       याप्रसंगी अध्यक्ष विश्वनाथजी शेवाळे, दत्तात्रय खराटे, संचालक पळसकर, नंदकिशोर लद्धा, प्रा. तायडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनिकांत मिसाळ, प्रभाकर बाजड, पत्रकार प्रमोद देशमुख, कास्तकारचे अध्यक्ष विष्णू बाजड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवर तथा विध्यार्थ्यांनी वीर बिरसा मुंडा यांच्या जीवन, कार्यावर प्रकाश टाकला. संचालन किशोर सदार यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश घुगे यांनी मानले. 
       स्वातंत्र्यदिनी विविध कार्यक्रम याठिकाणी पार पडणार असून, त्याची जय्यत तयारी सुरु आहे. 13 ते 15 राष्ट्रध्वज फडकवला जात असून आदिवासी विध्यार्थांचा उत्साह द्विगुणित झालेला दिसून येत आहे.