१०० कोटी सोनेतारणाच्या विक्रमाला गवसणी!* राजर्षी शाहू मल्टिस्टेटची सहकारात यशस्वी घोडदौड

१०० कोटी सोनेतारणाच्या विक्रमाला गवसणी!
* राजर्षी शाहू मल्टिस्टेटची सहकारात यशस्वी घोडदौड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीने विक्रमी १०० कोटी रुपयांच्या सोनेतारण कर्जवाटपाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. तत्पर व जलद सेवा, ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि शिस्तीच्या जोरावर संस्थेने सहकारात आपला ब्रँड स्थापित केला आहे.   

         संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या कुशल नेतृत्वात संस्थेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. ग्राहकांचे हीत जोपासत असतांना कायमच दर्जेदार सेवा देण्यावर संस्थेचा भर राहिला आहे. नुकताच संस्थेने १०० कोटी रुपए सोनेवाटपाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. एकवेळ १०० कोटींच्या ठेवी मिळवणे सहज शक्य आहे. मात्र, १०० कोटींचे सोनेतारण ही सोपी गोष्ट नाही. या कामगिरीमुळे वित्तीय क्षेत्रात राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा दबदबा आणखी वाढला आहे. दरम्यान संस्थेच्या राज्य आणि राज्याबाहेरील सर्व ६९ शाखांवर सोनेतारणाचा यशस्वी टप्पा गाठल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुख्यालयी संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके, ग्राहक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
* सुरक्षित कर्ज म्हणजे सुरक्षित ठेवी : 

       सोनेतारण हे एक सर्वात सुरक्षित कर्ज आहे. इतर कर्ज प्रकारांत अनेक अडचणी आहेत. वसुलीत कर्मचाऱ्यांना अनेकदा त्रास होतो. कर्ज वसुली नसल्यामुळे संस्था अडचणीत येण्याची शक्यता असते. त्यातुलनेत सोनेतारण सोयीचे आहे. अवघ्या काही मिनिटांत सोन्याचे मूल्यमापन करून कर्ज मंजुरी होते. कमी व्याजदर, कमी कागदपत्रे, जलद प्रक्रिया यामुळे शेतकरी, छोटे व्यापारी, नोकरदार यांना या योजनेचा लाभ होतो. 'सुरक्षित कर्ज म्हणजे सुरक्षित ठेवी' असल्याचे संस्थेने सांगितले. 

        नुसती ठेववाढ व संस्थेची प्रगती करुन चालणार नाही तर ग्राहक, ठेवीदारांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्वाची आहे. संस्थापक अध्यक्ष संदीपजी शेळके यांच्या मार्गदर्शनात १०० कोटी सोनेतारण कर्ज वाटपाची यशस्वी कामगिरी करता आला याचा आनंद आहे. याबद्दल सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. संस्थेच्या सर्व शाखांवर जलद सोनेतारण कर्ज उपलब्ध आहे. ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

-मालतीताई शेळके
संस्थाध्यक्षा, राजर्षी शाहू मल्टिस्टेट, बुलढाणा