बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे योग दिन साजरा

बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे योग दिन साजरा 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         मॉडेल डिग्री कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा करण्यात आला. मॉडेल डिग्री कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आयोजन आज 21 जून रोजी करण्यात सकाळी 7 वाजता  करण्यात आले होते. मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांनी योग दिना संदर्भात मार्गदर्शन केले. आरोग्यदायी जीवनासाठी योगाचे महत्त्व सांगितले.               याप्रसंगी 'योगा फॉर हेल्दी एजिंग' या वर्षाच्या थीम नुसार प्रत्येकाने आपल्या निरोगी आयुष्यासाठी दैनंदिन जीवनात किमान एक तास तरी योग प्राणायम आणि आसने यासाठी द्यावा, असे विचार डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांनी यावेळी व्यक्त केले. तज्ञ योग प्रशिक्षक प्रा. अरुण एस. रिंढे,  प्रा. सौ. सुनीता गायकी यांनी विविध आजारांवर योग प्राणायम आणि विविध आसनं यांचे महत्व प्रात्यक्षिक सादर करून सांगितले.
         या प्रसंगी डॉ. मनोज डांगे, प्रा. शिल्पा इंगळे पाटील, प्रा. शिला रोकडे,  प्रा. दिलीप माने, प्रा. गुलाबराव सोनोने, प्रा. चंद्रशेखर भांदक्कर, शिक्षकेतर कर्मचारी रूपाली गुडधे उपस्थित होते.