*बुलढाणा तालुका मनसेने राबविले विविध समाजोपयोगी उपक्रम
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा तालुका मनसे व रुद्रांशी मल्टीपर्पज फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वर्षभरात तब्बल ५८०० वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी दिली.
वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात १४ जून रोजी सकाळी ९.३० वाजता बुलढाणा येथील कालिंका माता मंदिरात देवीची आरती व साडी-चोळीची ओटी भरून करण्यात आली.यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना मनसैनिकांनी केली. त्यानंतर त्रिशरण चौक येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. तर रविवारी सकाळी १०.३० वाजता तांदूळवाडी येथील स्मशानभूमी व मंदिर परिसरात १०० वृक्षांचे रोपण करून वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. तसेच ११ वाजता मड येथील नंदनवन गोशाळेत चारा व फळांचे वाटप करत अमोल रिंढे पाटील यांच्या हस्ते गोसेवा करण्यात आली. यावेळी गोशाळाचे अध्यक्ष, संचालक, तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील, तालुका सचिव आशिष गायके, विनोद पवार आर्मी रिटायर विजय जाधव, तालुका उपाध्यक्ष गणेश इंगळे विभाग अध्यक्ष ऋषिकेश ठेंग, पवन सरोदे ,भागवत जाधव ,प्रवीण गायकवाड, कृष्णा रिंढे , हर्षल पाटील गोपाल पाटील यांच्यासह मनसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
* सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न : अमोल रिंढे पाटील
बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे पाटील यांनी सांगितले की, राज साहेब ठाकरे यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजहित, पर्यावरण संवर्धन आणि सेवा कार्याला प्राधान्य देत बुलढाणा तालुका मनसे वर्षभरात ५८०० वृक्षांचे रोपण करणार आहे. या मोहिमेची सुरुवात १०० वृक्षांचे रोपण करून झाली असून पावसाळ्यातील पुढील चार महिन्यात ५८०० वृक्षांचे रोपण होणार आहे. आम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा समाजाप्रती असलेली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
