सहकारी पतसंस्था चळवळीचा वारसा जपण्यासाठी कटीबद्ध : संदीपदादा शेळके * राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा करमाड येथील ग्राहक मेळावा उत्साहात

सहकारी पतसंस्था चळवळीचा वारसा जपण्यासाठी कटीबद्ध :  संदीपदादा शेळके  
* राजर्षी शाहू मल्टिस्टेटचा करमाड येथील ग्राहक मेळावा उत्साहात
  
छत्रपती संभाजीनगर : (एशिया मंच न्यूज )
           काही चुकीच्या प्रवृत्तीमुळे मराठवाड्यातील सहकारी पतसंस्था चळवळीचे नुकसान झाले. त्यामुळे हा वारसा जपण्यासाठी व टिकवण्यासाठी राजर्षी शाहू पतसंस्था कटीबद्ध आहे. समाजहित आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी भविष्यातही अधिक जोमाने कार्यरत राहण्याचा निर्धार संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला. 

         राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या करमाड शाखेचा ग्राहक मेळावा १३ जून रोजी एपीजे अब्दुल कलाम सभागृह, करमाड येथे मोठ्या उत्साहात व आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून संदीपदादा शेळके बोलत होते. प्रमुख मान्यवर भावराव मुळे, कचरू अण्णा कुलकर्णी, दत्ता उकर्डे, कैलास उकर्डे, भोसले सर तसेच डॉ. जिजा कोरडे यांनी मनोगतात संस्थेने अल्पावधीत केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. ग्राहकांशी थेट संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात येणारे ग्राहक मेळावे ही संस्थेची वेगळी आणि विश्वासार्ह कार्यपद्धती असल्याचे त्यांनी नमूद केले.
    
        याप्रसंगी गणेश मुळे, कृष्णा उकर्डे, सुनील तारो, गुड्डू उकर्डे, लाला उकर्डे, विभागीय व्यवस्थापक चेतन गवते, सहायक विभागीय व्यवस्थापक मीनाक्षी साळुंके, शाखा व्यवस्थापक कल्याणी पडघान, विकास डोणगावकर, राज खडके, महेंद्र राजपूत यांच्यासह संस्थेचे ग्राहक, सभासद, भागधारक, ग्रामस्थ, स्थानिक मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.
* महिला, शेतकरी, लघु उद्योजकांचे आर्थिक सक्षमीकरण हेच ध्येय :

          संदीपदादा शेळके यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. रक्तदान चळवळ, शेतकरी हिताचे उपक्रम, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिलेले सहकार्य, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेले खत वाटप, आरोग्य शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती उपस्थितांसमोर मांडली. यावेळी संस्थेमार्फत बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले. लाभार्थींना मान्यवरांच्या उपस्थितीत धनादेश प्रदान करताना त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी संस्था सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाही संदीपदादा शेळके यांनी दिली. ग्रामीण भागातील महिला, शेतकरी आणि लघुउद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच आमचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले.