वारसाला अपघाती विम्याचा धनादेश प्रदान* राजर्षी शाहू मल्टिस्टेटची सामाजिक बांधिलकी

वारसाला अपघाती विम्याचा धनादेश प्रदान
* राजर्षी शाहू मल्टिस्टेटची सामाजिक बांधिलकी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        बँकिंग क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राजर्षी शाहू मल्टिस्टेटने आपल्या खातेदाराप्रती असलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. मलकापूर येथील खातेदार स्व. अनिल एकनाथ मालठाणे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला संस्थेमार्फत १ लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा धनादेश देण्यात आला. संस्थाध्यक्षा मालती शेळके यांच्या हस्ते वारस पत्नी मीना मालठाणे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
​       आपल्या खातेदारांचे भविष्य सुरक्षित राहावे आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाला संकटकाळात आधार मिळावा, या उद्देशातून राजर्षी शाहू मल्टिस्टेटमार्फत खातेदारांचा 'अपघाती विमा' काढला जातो. स्व. अनिल मालठाणे यांच्या अकाली निधनानंतर या विम्याच्या मंजुरीसाठी केअर हेल्थ इन्शुरन्स लिमिटेडचे अधिकारी हितेश ठक्कर यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून हा विमा दावा तातडीने मंजूर करण्यात आला. खातेदारांच्या केवळ प्रगतीतच नव्हे, तर त्यांच्या संकटकाळातही कुटुंबप्रमुख म्हणून मदतीचा हात देणे आणि त्यांच्या भविष्याची सुरक्षित उपाययोजना करणे हेच राजर्षी शाहू परिवाराचे खरे ब्रीद आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी स्थानिक संचालक ॲड. साहेबराव मोरे, प्रवीण पाटील, अनंतराव सराफ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक संजय सावळे, ज्ञानेश्वर हिवाळे, बाजार समितीचे संचालक प्रवीण क्षीरसागर, सिद्धिविनायक सर्जिकलचे डॉ. हागे, मंगलम पतसंस्थेचे शाखा व्यवस्थापक रवींद्र कुकडे, माजी शिक्षिका तुपकरी, वैशाली भोईटे, सह्याद्री अर्बनचे व्यवस्थापक दिलीप पाटील, कॅनडा बँकेचे मॅनेजर दीपक दिगोडे, रिफ्रेश कंपनीचे सुजित पाटील, जयश्री पाटील, शिवराज इलेक्ट्रॉनिकचे प्रशांत पाटील, राजर्षी शाहु मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विभागीय व्यवस्थापक नीलेश व्यवहारे, शाखा व्यवस्थापक रवी टीकार, योगिता ताडे, अमोल कुकडे, संगीता घोंगटे व कर्मचारी उपस्थित होते.