ग्रामीण विकासाला नवी दिशा देणार : संदीपदादा शेळके* राजर्षी शाहू मल्टीस्टेट शेंदुर्णी शाखेचा ग्राहक मेळावा उत्साहात

ग्रामीण विकासाला नवी दिशा देणार : संदीपदादा शेळके
* राजर्षी शाहू मल्टीस्टेट शेंदुर्णी शाखेचा ग्राहक मेळावा उत्साहात
शेंदूर्णी : (एशिया मंच न्यूज )
      आगामी काळात शेतकरी, उद्योजक आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा देण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी केले.
राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी शाखेचा ग्राहक मेळावा 5 जून रोजी माहेश्वरी मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर संचालक मंडळ, सेवानिवृत्त शिक्षक, माजी सैनिक, गुणवंत डॉक्टर, वकील तसेच नव्याने सैन्यात भरती झालेल्या तरुणांचा सत्कार करण्यात आला.
       यावेळी संजय गरुड, सागरमल जैन, उत्तम थोरात, अॅड. शुभांगीताई फासे यांनी संस्थेने अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन करून केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक केले. पुढे बोलतांना संदीपदादा शेळके यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विक्रमी रक्तदान शिबिर, शेतकरी हिताचे उपक्रम, कोल्ड स्टोरेज, धान्य गोदाम यांसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत भविष्यात कृषी आधारित उद्योगांना चालना देणे तसेच छोट्या व्यावसायिकांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचा विशेष भर राहणार असल्याचे सांगितले.
         याप्रसंगी शांतीलाल जैन, सुहास जैन, नितीन भिसे, वामन फासे, राजेंद्र पाठक, श्रीराम चौधरी, डॉ. मोहन बडगुजर, रामचंद्र कऱ्हे, रउफ रशीद मन्यार, प्रफुल जैन, नवल गवई, भागवत गवई, प्रशांत जोशी, श्रीकांत काबरा, राहुल गरुड, विजय शिरपूरे, नज्जू काझी, प्रमोद कासार, अनिल जैस्वाल, शीतल जैन, मनोज अग्रवाल, शरद गुजर, डॉ. किरण सूर्यवंशी, शिवलाल राका, बालमुकुंद अग्रवाल, विभागीय व्यवस्थापक सतीश बोहरपी, गोविंद येवले, स्वप्नील कुळसुंदर, नीलेश व्यवहारे, शाखा व्यवस्थापक देविदास सांखला यांचेसह स्थानिक संचालक मंडळ, सभासद, भागधारक, नागरिक तसेच शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.