उर्दू कनिष्ठ महाविद्यालय येथे उच्चशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करा* अमन ग्रुप आणि अल मदीना एजुकेशन फाउंडेशनची निवेदन द्वारे मागणी

उर्दू कनिष्ठ महाविद्यालय येथे उच्चशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करा
* अमन ग्रुप आणि अल मदीना एजुकेशन फाउंडेशनची निवेदन द्वारे मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        स्थानिक उर्दू हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, बुलढाणा येथे आगामी काळात रिक्त होणाऱ्या उर्दू विषयाच्या शिक्षक पदावर केवळ उच्चशिक्षित आणि 'CET', 'TET' उत्तीर्ण पात्र उमेदवारांचीच नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करत अल मदिना फाउंडेशन आणि अमन ग्रुपने निवेदनाद्वारे मुख्याध्यापकांकडे करण्यात आली आहे. गुणवंत उमेदवारांना प्राधान्य दिल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वासही यात व्यक्त करण्यात आला आहे.
         मुख्याध्यापकांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एक चांगला शिक्षक असंख्य पिढ्या घडवण्याचे काम करतो. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या उर्दू शिक्षकाच्या भरती प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे. उर्दू शिक्षण संस्थेचे विश्वस्त आणि शाळा प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता, मेरिट लिस्ट मधील उत्कृष्ट, होतकरू आणि उच्चशिक्षित उमेदवारास संधी द्यावी, जेणेकरून शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावेल. शाळेतील अस्वच्छते बाबत संताप या निवेदनाच्या माध्यमातून पालकांनी व सुजाण नागरिकांनी शाळेतील अस्वच्छतेच्या गंभीर मुद्द्याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. 
         शाळेतील वर्गखोल्या, स्वयंपाकगृह (किचन शेड), स्वच्छतागृह यासह चक्क मुख्याध्यापकांचा कक्षही अनेकदा अस्वच्छ आढळल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच शाळेच्या भिंती आणि तेथे लावण्यात आलेले फोटो धुळ आणि जळमटांनी माखलेले दिसून आले आहेत. ही अत्यंत खेदजनक बाब असून, मुख्याध्यापकांनी शाळेतील शिपाई कर्मचाऱ्यांकडून तात्काळ स्वच्छतेची कामे करून घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. शाळेची शिस्त आणि देखणेपणा वाढवण्यासाठी शाळेतील सर्व शिपाई कर्मचाऱ्यांना 'ड्रेसकोड' (गणवेश) अनिवार्य करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अमन ग्रुपचे संस्थापक जुबेर खान,   अल, मदीना एजुकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांची स्वाक्षरी आहे.