शिक्षक मतदारामध्ये माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना संधी द्यावी* अमरावती शिक्षक मतदार यादीतील संभ्रम दूर करा : प्रा.डी. एस. लहाने



शिक्षक मतदारामध्ये माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना संधी द्यावी
* अमरावती शिक्षक मतदार यादीतील संभ्रम दूर करा :  प्रा.डी. एस. लहाने 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       अमरावती शिक्षक मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र यादीत मध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. तो दूर करण्यात यावा व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांना मतदानाची संधी द्यावी, अशी मागणी 
शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सह संपर्कप्रमुख
प्रा. डी. एस. लहाने यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

        निवेदनात म्हटले की, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये मतदार नोंदणी करून यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.
       भारत निर्वाचन आयोगाच्या पत्रामधील 1.3.2 मधील तरतुदीमध्ये माध्यमिक शाळेचा उल्लेख आहे. मात्र माध्यमिक शिक्षकांचा नाही. त्यामुळे माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक पात्र असावे. आजपर्यंत झालेल्या शिक्षक मतदार संघात माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक मतदार म्हणून पात्र धरले होते. माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकांनी आजपर्यंत सदर मतदार संघात मतदान केलेले आहे. आज रोजी अमरावती मतदार संघाच्या नोंदणीमध्ये सुध्दा अनेक ठिकाणी सर्व शिक्षकांची नोंदणी झालेली आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः बुलडाणा जिल्ह्यात नव्याने माध्यमिक शाळेतील 9, 10 व 11 वी, 12 वी ला शिकविणाऱ्या शिक्षकांचीच नोंदणी करण्याचे निर्देश दिल्या गेले आहे. तसेच शासनमान्य सेल्फ फायनान्स च्या शाळा व इतर टेक्नीकल संस्था, विनाअनुदानित महाविद्यालये, विनाअनुदानित अपंग/मुकबधीर/ शाळा, मतिमंद शाळा येथील कार्यरत शिक्षकांना शिक्षणाधिकारी यांचे अँप्रूव्हल नसते. संस्था स्तरावर ते कार्यरत असतात. त्यांची सुध्दा मतदार म्हणून नोंदणी होणे आवश्यक आहे. अनेक तालुक्यात त्याची नोंदणी करण्यासाठी प्रशासनाने नकार दर्शविला आहे.
         तरी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणी मधील हे संभ्रम तात्काळ दूर करावे, जेणेकरून कोणतेही शिक्षक मतदानाच्या अधिकारा पासून वंचित राहणार नाही.अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. लहाने यांच्यासह प्रमोद पवार, सुरेश काळे दौलत नरवाडे, बबनराव पवार, राजेंद्र शिरसाठ, संजय शिंदे, गौरव देशमुख, अतिश्वर भोरकर, प्रमोद मोहरकर, सुनिल दाभाडकर, स्वप्निल काकडे आदी उपस्थित होते.