रुग्णांच्या जीवनाशी खेळ, सर्व असूनही युनिट बंद* जिल्हा रुग्णालयातील एमआरआय सेंटर चा ताबा घेणार मनसे

रुग्णांच्या जीवनाशी खेळ, सर्व असूनही युनिट बंद
* जिल्हा रुग्णालयातील एमआरआय सेंटर चा ताबा घेणार मनसे 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         जिल्ह्याच्या आरोग्याची मतदार ज्या रुग्णालयावर विसंबून आहे, त्या जिल्हा रुग्णालयातील अनागोंदी कारभार व विसंवादामुळे रुग्णांच्या जीवाशी गाठ येत आहे. जिल्ह्यातून सर्वात मोठा समृद्धी मार्ग गेला आहे. दररोज वेगवेगळे जीवघेणे अपघात होतात. मात्र जिल्हा रुग्णालयांमध्ये असणारे एमआर युनिट तयार असूनही रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिले जात नाही. याचा निषेध करीत मनसेचे नेते अमोल रिंढे यांनी जिल्ह्यातील रुग्णसेवेसाठी सकारात्मक पाऊल उचलले असून युनिट कार्यान्वित करा, अन्यथा... मनसेच्या वतीने एमआरआय सेंटर ताब्यात घेऊ व बाह्य यंत्रणेकडून ते चालवू असा इशारा दिला आहे.

         आज 5 मार्च रोजी आरोग्य मंत्री, आरोग्य संचालक यांना पत्रव्यवहार करून मनसेने आपला आक्रमक इरादा जाहीर केला. बुलढाणा जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील मोठी प्रशासकीय यंत्रणा आहे. याच ठिकाणी मेडिकल कॉलेज रुजू होत आहे. मात्र प्राथमिक सुविधांचा अभाव या रुग्णालयात कायम दिसून आला. कधी डॉक्टरांची वाणवा तर कधी एमआरआय, सीटीस्कॅन ची वानवा येथे सातत्याने दिसली. सध्या एमआरआय सेंटर बांधून पूर्ण झालेले आहे. मात्र यंत्रणेचा विसंवाद व प्रशासनातील उदासीनता यामुळे गेल्या काही दिवसापासून हे युनिट रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत आहे. सर्व काही असूनही रुग्ण अकोला, अमरावती तर जालना औरंगाबाद रेफर करावे लागतात. बरेचशे रुग्ण जळगावचाही आसरा घेतात. गोरगरीब रुग्णांसाठी हे परवडणारे नाही. कठीण प्रसंगी शासकीय रुग्णालय मोठा आधार ठरते. या ठिकाणची युनिट बंद असल्याने नाईलाजाने की होईना रुग्णांना बाहेर रेफर करावे लागते. यामध्ये रुग्णांचा पैसा, वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. याची गांभीर्याने दखल घेत मनसेचे नेते अमोल रिंढे पाटील यांनी हे युनिट कार्यान्वित करा अन्यथा ते ताब्यात घेऊन बाह्य यंत्रणे मार्फत चालविण्याचा इशारा दिला आहे.