बुद्धेश्वर संस्थांच्या महाप्रसादाचा हजारो भक्तांनी घेतला लाभ* बोरखेड येथील सर्वधर्म समभावाचे अनोखे प्रतिक


बुद्धेश्वर संस्थांच्या महाप्रसादाचा हजारो भक्तांनी घेतला लाभ
* बोरखेड येथील सर्वधर्म समभावाचे अनोखे प्रतिक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         सातपुडा पर्वत रांगेतील पायध्याशी दुर्गम भागात वसलेले बोरखेड येथे पारंपारिक वारसा जपत गुढीपाडव्याच्या शुभमुर्तावर आज दि. 19 मार्च रोजी महाप्रसादाची आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सुरुवात होळीच्या दिवसापासून सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी या गावातील व परिसरातील भाविक भक्त हा दिवस दिवाळी म्हणून साजरी करतांना दिसून येतात.
  बुलढाणा जिल्ह्यातील बोरखेड येथील बुद्धेश्वर संस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवादरम्यान विवाह करुन सासरी गेलेली मुली तसेच कामानिमित्त बाहेर गावी गेलेले मुले सुध्दा या पारंपारिक कार्यक्रमाला हजेरी लावतात. हे गावाचा सलोखा दिसून येतो. पंचकोशीतील नव्हे तर बुलढाणा जिल्ह्याचे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले बुद्धेश्वर संस्थान येते लाखोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात जेणेकरून येथे यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. एके काळी एक क्विंटल पासून सुरु झालेला महाप्रसाद (भंडारा) आज 35 क्विंटलपर्यंत करण्यात आला आहे. शिस्तबद्ध पद्धतीने भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. भाविकांना महाप्रसादाची कमी पडू नये म्हणून संस्थांचे कार्यकर्ते सेवा देतात. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यावेळी संस्थांनचे विश्वस्त, गावातील सरपंच, जेष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        या महोत्सवा दरम्यान संस्थानला भाविक मोठ्या मनाने देणगी देतात. यामधून मिळालेल्या देणगीतून संस्थानचे विकास कामे केला जातात. सोबतच गावातून वर्गणी जमा करून भंडारा केला जातो व उरलेल्या देणगी स्वरुपातील पैश्याची पंचा समक्ष मोजणी केली जाते. सर्व पैश्याचा हिशोब करुन उरलेले पैसे ज्या लोकांना आवश्यकता असेल त्यांना पुढील वर्षी म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदर (महाप्रसाद) दिलेल्या पैशाचा हिशोब केला जातो. असे एक पैशाचाही भ्रष्टाचार न करता या संस्थेचा कारभार पारदर्शकपणे अविरत सुरु आहे.
        विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या महाप्रसाद (भंडारा) सोहळ्यामध्ये कोणीही नावासाठी काम करत नाही , जो-तो आप-आपल्या परीने एक जुटीने काम करतो आणि येणाèया भावी भक्तांना महाप्रसादाचा लाभ कसा देता येईल , याचे पुरेपूर प्रयत्न गावातील प्रत्येक संस्था सदस्य करत असतो. यावेळी एकाच वेळी एका पंक्तीत हजार पेक्षा अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. जवळपास एक वाजेपासून महाप्रसादाला सुरुवात होते. या महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त घेतात.
       तर एकीकडे सध्या संपूर्ण जगात इस्त्राईल-अमेरिका व इराण युद्धामुळे गॅस चा तुटवडा जाणवत असताना सुद्धा बोरखेड येथे हजारो लोकांचा महाप्रसाद (भंडारा) हा पारंपारिक पद्धतीने (इंधन) लाकडावर केला जात आहे. सध्याच्या काळात हॉटेल्स, मेस, खानावळ गॅसच्या तुटवड्यामुळे बंद झालेले आहे , परंतु बोरखेड येथील जनतेने या सर्व बाबीवर मात करून हजारो लोकांना महाप्रदाच्या माध्यमातून जेवू घातले आहेत.