बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
समानता, स्वातंत्र्य व सन्मान केवळ संविधानातील शब्द नसून स्त्रीच्या जगण्याची मूलभूत तत्वे आहेत. संविधानाने महिलांना अधिकार दिले, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव तेव्हाच येईल जेव्हा समाज म्हणून आपण ते मान्य करू, पाळू आणि संरक्षण करू! अन्यायाविरोधात आवाज उठवणे, स्त्री च्या निर्णय स्वातंत्र्याचा सन्मान करणे व समानतेसाठी संघटित होणे हेच संविधानाच्या मूल्याचे प्रत्यक्ष पालन आहे, असे मत शिलाताई पाटील यांनी प्रगती सार्वजनिक वाचनालय व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, सीटू च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित उपेक्षित महिलांच्या जीवन संघर्षाचा सन्मान या कार्यक्रमात अध्यक्षिय भाषण करताना त्यांनी व्यक्त केले.
हक्काचे व अधिकाराचे संरक्षण केवळ कायद्यामुळे होत नाही ते समाजाच्या सामाजिक आणि नैतिक जाणिवेमुळेच सुनिश्चित होते. संघर्ष शिवाय आज पर्यंत स्त्रीला काहीच मिळालेले नाही. हा आजवरचा इतिहास आहे, असे मत या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेल्या जिल्हा कारागृह अधीक्षक मेधाताई बाहेकर यांनी व्यक्त केले. यावेळी मंचावर नवनिर्वाचित नगरसेविका दिव्यांगना ताई ठाकरे प्रा.डॉ.कि.वा.वाघ, सिटूचे राज्य सहसचिव पंजाबराव गायकवाड, सुनिताताई जाधव यांनी सुद्धा यावेळी आपले समोयोचित मनोगत व्यक्त केले.
शासनाच्या वेगवेगळ्या योजनेत महत्वाची भूमिका बजावत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा व गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका, शालेय पोषण आहार कामगार अल्प आणि प्रामाणिकपणे काम करिता असल्या तरी त्या उपेक्षित आहेत. ह्या उपेक्षित असलेल्या २१ कर्तृत्ववान महिलांच्या जिवन संघर्षाचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सूरूवात शारदा लिंगायत यांच्या स्वागत गीतांनी झाली. तसेच शाहीर डि.आर.इंगळे यांनी महिलांचा सन्मान जागविणारे प्रेरणादायी गीत सादर केले तसेच सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर केणे यांनी शुभेच्छा दिल्या, साहित्यिक सुरेश साबळे, प्रा.प्रतापराव सपकाळ, डॉ.इंदूमती लहाने, रमेश इंगळे, युवराज कापरे, सर्जेराव चव्हाण, रविकिरण टाकळकर, गजानन अंभोरे, सरला इंगळे, अनिताताई कापरे, डॉ. विजयाताई काकडे, शारदा इंगळे अनिता ठाकरे, मंदा डोंगरदिवे, दिपाली एंडोले, माया वाघ, शोभा काळे, सरला मिश्रा, ललिता बोदडे, जयश्री तायडे, सिंधू अवसरमोल, प्रज्ञा तायडे, सुवर्णा लाटे, वैशाली चाहकर, लक्ष्मी गवई, विजया ठाकरे, पुष्पा सिरसाठ,सुनिता दुधारे,सिंधू चव्हाण, रंजना निकाळजे, शितल राजपूत, माया डिवचले इत्यादीसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक, अर्धवेळ स्त्री परिचारिका, शालेय पोषण आहार कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई पाटील यांनी केले तर आभार प्रगती वाचनालयाचे पुरूषोत्तम गणगे यांनी मानले.
