बुलडाणा अर्बनच्या वतीने गिरडा घाटात मॅरेथॉन उत्साहात * स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद

बुलडाणा अर्बनच्या वतीने गिरडा घाटात  मॅरेथॉन उत्साहात 
* स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद 
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
          बुलडाणा अर्बन यांच्या वतीने आयोजित २१, १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा  गिरडा घाट परिसरात मोठ्या उत्साहात पार पडली. या मॅरेथॉनमध्ये तब्बल १००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवत फिटनेस, आरोग्य व सामाजिक जाणीवेचा संदेश दिला. या फॉरेस्ट मॅरेथॉन २१ किलोमीटर  १८ ते ४५ वयातील गटांतील प्रथम स्पर्धेत पुरुष मध्ये आकाश बारवाल, गौरव हिवाळे, जीवन भालके, तर महिला गटातून रितू तळमळे, प्रणिता पाटील, रती महाजन, ४५ वयातील पुढील पुरुष व महिला राजेश कोचे, प्रशांत राऊत, अजबराव आखरे, महिला गटातून राधिका दमाणी, डॉ. अनिता राठोड, वैशाली बडगुजर, यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून या स्पर्धेवर मोहोर उमटवली.
         यावेळी मॅरेथॉन स्पर्धेत १० किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये 
पुरुष व महिला १८ ते ४५ या गटातील विजेते पुढील प्रमाणे आहे. यश पांडे, सागर मोरे, विदेश वाघ, तृप्ती जाधव, सोनाली पाठक, मृणाल पडोसळे, १० किलोमीटर ४६ या पुढील वयातील पुरुष व महिला शरद खिल्लारे, महेश महाजन, संजय तेली , तर महिला अनिता युवराज कापरे, अनुपमा मोटवानी, मंगल गवई आदींनी विजय संपादन केला. गिरडा येथील स्वयंप्रकाश संस्थान येथे सकाळी  बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या सह बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर, आ. संजय गायकवाड, पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे, नितीन चौधरी गिरडा चे सरपंच श्रीमती सुनिता गायकवाड, अनंताभाऊ देशपांडे यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली .
         या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच ही स्पर्धा पुर्ण करणाऱ्या सहभागी सर्व धावकांना बुलडाणा अर्बन संस्थेच्या वतीने पदके देण्यात आली. स्पर्धेला मदत करणाऱ्या सर्व पंच व अधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी  परिश्रम घेतले अशा सर्वांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी धावकांसाठी बुलडाणा अर्बन संस्थेच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती. धावनपथावर ठिकठिकाणी पाणी,फळे, बिस्किटे यांचे स्टाॅल लावण्यात आले होते.
प्रथमच गिरडा येथे अतिशय सुंदर अशा या फॉरेस्ट मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धावकांनी या दरम्यान पर्यटनाचा सुध्दा आस्वाद घेतला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समारोप बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी केले. या कार्यक्रमाला क्रिडाप्रेमी व गिरडा वासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान स्वयंसेवक, वैद्यकीय पथक व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत कार्यक्रम यशस्वी केला. मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यशस्वी आयोजना बद्दल ज्ञानगंगा फॉरेस्ट रणर ग्रुप, रणरागिणी रनिंग ग्रुप तसेच सहभागी स्पर्धकांनीही समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. एकूणच बुलडाणा अर्बनच्या या ५ किमी मॅरेथॉनने शहरात आरोग्य, फिटनेस आणि उत्साहाची लाट निर्माण केली असून युवकांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. सदर स्पर्धेसाठी बुलडाणा अर्बन संस्थेचे कर्मचारी, सहकार विद्या मंदिर चे विद्यार्थी व शिक्षकोत्तर कर्मचारी आणि ज्ञानगंगा फॉरेस्ट रणर ग्रुप व रणरागिणी रनिंग ग्रुप यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी करण्यात आला.


निसर्गरम्य वातावरण, थंड हवामान आणि उत्साही वातावरणामुळे स्पर्धकांमध्ये विशेष जोश पाहायला मिळाला. तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपली शारीरिक क्षमता, चिकाटी व शिस्त दाखवून दिली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आरोग्याबाबत जनजागृती करणे, नियमित व्यायामाची सवय लावणे आणि युवकांना सकारात्मक दिशेने प्रेरित करणे हा होता.
        यावेळी सहकार विद्या मंदिराच्या विद्यार्थी बॅण्ड पथकाने संगीतातील विविध प्रकारचे प्रदर्शन केले. तसेच वन्यजीव प्राण्यांचा वेश परिधान करून जंगल बचाव संदेश या माध्यमातून दिला.