* शिवराज नगरात दिंडीचे मार्गक्रमण
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विदर्भाची पंढरी म्हणून विख्यात, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे संत श्री गजानन महाराजांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त आज 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्थानिक गजराज नगर येथे गजानन महाराज संस्थान शिवराज नगर गोडबोले लेआउट बुलढाणा यांच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिंडीचे मार्गक्रमण करण्यात आले. यावेळी परीसरातील भाविक भक्तांनी मोठ्या उत्सहात सहभाग नोंदविला होता.
