बुलढाण्यात शिवजयंतीचा उत्साह; दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

बुलढाण्यात शिवजयंतीचा उत्साह; दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सकाळी शहरातून काढलेल्या मोटार सायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. 
         हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज १९ फेब्रुवारी रोजी ३९६ वी जयंती आहे.स्थानिक जिजामाता क्रीडा प्रेक्षागार येथे शिवजयंतीनिमित्त बाल शिवाजी यांचा पाळणा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी जय शिवाजी, जय भवानी गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून गेला होता. शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. शहरातील रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी मंडप टाकून तिथे शिवरायांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. रॅलीतील मान्यवरांच्या वतीने मानवंदना देण्यात आली.