बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विविध सामाजिक, धार्मिक चळवळीत योगदान देणारे, आंबेडकरी वैचारिक चळवळीचा समृद्ध वारसा आयुष्यभर जपणारे इंजि. विजय मोरे यांची आनंदराज आंबेडकर यांच्या रिप-ब्लिकन सेनाच्या बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. रिपब्लिकन सेनेचे विदर्भ अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी विजय मोरे (सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर) यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. विजयजी मोरे यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेसोबतच सामाजिक, आंबेडकरी चळवळीत केलेल्या निष्ठावान कार्याची दखल घेत रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी हे नियुक्ती पत्र प्रदान केले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी, रिपब्लिक सेनेचे महाराष्ट्र नेते प्रा. सुनिल वाकेकर इत्यादी उपस्थित होते. विजय मोरे हे केवळ प्रशासकीय सेवेत असताना व सेवानिवृत्तीनंतरही वंचित, शोषित, दलित व बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी हेच त्यांच्या कार्याचे केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि जनसामान्यांशी असलेल्या थेट नात्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेला बळ मिळेल.
