* अध्यक्षपदासाठी होणार निवड
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने 23 फेब्रुवारी 2026 वार सोमवार ला स्थानिक विश्राम गृह येथे सायंकाळी ६ वाजता महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये, जयंती उत्सव समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. त्यानुसार यंदाही, प्रबोधनात्मक आणि वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे, आयोजन करण्यासाठी नवीन अध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे, याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने 23 फेब्रुवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे सायंकाळी सहा वाजता महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा शहरातील तमाम आंबेडकरी जनतेनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2025 चे मावळते अध्यक्ष निलेश राऊत यांनी केले आहे.
