प्रा. सुनील सपकाळ यांनी उबाठाची घेतली मशाल हाती * उबाठाकडून उमेदवारी अर्ज दाखल

प्रा. सुनील सपकाळ यांनी उबाठाची घेतली मशाल हाती 
* उबाठाकडून उमेदवारी अर्ज दाखल
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व जिल्ह्यातील काँग्रेसचा वैचारिक चेहरा , थिंक टँक राहिलेले प्रा. सुनील सपकाळ यांनी काँग्रेसच्या पंज्या ऐवजी मशाल हाती घेतली आहे. जागा वाटाघाटी मध्ये प्रभाग 15 उबाठाला सुटला. त्यामुळे त्यांनी उबाठाची मशाल हाती घेत काल ठाकरे शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी प्रभाग १५ मधून त्यांना अर्ज दाखल केला. 

          जिल्हा काँग्रेसमध्ये बोटावर मोजण्याइतके कार्यक्षम असणाऱ्या नेतृत्वांपैकी एक म्हणून प्राध्यापक सुनील सपकाळ परिचित होते. बुलढाण्यातील काँग्रेसचा खरा  बॅकबोन असणारे सपकाळ फ्रंटवर नसले तरी इतरांना फ्रंटवर आणण्याची जबाबदारी त्यांनी वारंवार सिद्ध करून दाखवली. कुठलीही निवडणूक या नावा शिवाय पूर्ण होऊ नये, अशी स्थिती होती. तन, मन, धनाने कार्य करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख राहीली. काँग्रेसमध्ये असताना त्यांना महत्त्वाच्या पदावर जाता आले नाही. आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व नगराध्यक्ष होण्याची क्षमता असणारा माणूस लाभांच्या पदावर उपेक्षित राहिला. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी त्यांची उमेदवारी मानली जात होती. मात्र बुलढाणा नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव निघाल्याने इथेही त्यांचा अपेक्षाभंग झाला. प्रभाग १५ मधून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी दिसत असल्याने पंजा ऐवजी त्यांनी मशाल घेणे पसंत केले. आमदार धीरज लिंगाडे, हेमंत खेडेकर, राजेश ठोंबरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके , जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थित त्यांनी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला आहे.
          बुलढाणा शहरामध्ये सर्वधर्मसमभाव व भाईचारा निर्माण होण्यासाठी लागणारे निकोप वातावरण निर्माण करण्याचे काम प्राध्यापक सुनील सपकाळ यांनी वारंवार केले. सर्व जाती धर्मांना जोडणारा दुवा म्हणून सपकाळ परिचित आहे. जिथे जातील तिथे व ज्यांच्या सोबत राहतील त्यांना बळकटी देणे हा त्यांचा स्थायीभाव राहिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्याने कार्यक्षम व्यक्ती मिळाल्याने ठाकरे सेनेला चैतन्य आले आहे.