लोणार : (एशिया मंच न्यूज )
ग्रामीण भागात शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविणे, समस्या सोडविणे व लोकसभागातून विकास साधने या उद्देशातून लोणार तालुक्यातील हिरडव महसूल मंडळात येत असलेल्या दाभा गावात सेवा पंधरवडा हा उपक्रम लोक सभागातून विकासाला चालना मिळण्याकरिता प्रभावीपणे राबविण्यासाठी लोणार तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या दाभा येथे महसूल शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे.
या सेवा पंधरवडा अंतर्गत 19 सप्टेंबर रोजी दाभा ग्रामपंचायत महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नायब तहसीलदार मयुर इप्पर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अभियानाची सुरवात करण्यात आली. यावेळी नायब तहसीलदार मयुर इप्पर यांनी महसूल विभाग हा सामान्य नागरिकांच्या जीवनाशी नियमित जोडलेला आहे. शेतकऱ्याला शेताचा सातबारा हवा असतो, विद्यार्थ्याला शाळेत प्रवेशासाठी दाखला, घरकुलासाठी जमीनपत्र किंवा दस्तनोंदणीसाठी सुलभ प्रक्रिया हे सारे प्रश्न महसूल विभागाशी निगडित आहेत. म्हणूनच या विभागाचे कामकाज जितके जलद, पारदर्शक आणि संवेदनशील असेल तितकीच जनतेची शासकीय यंत्रणेवरील नाळ घट्ट होईल.
महिलांना घरकुलाचा आधार मिळावा आणि दुर्बल घटकांना न्यायाचा मार्ग खुला व्हावा, ही सारी जबाबदारी महसूल विभागाने सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. जिवंत सातबारा – सलोखा योजना निराधार योजनाची माहिती देण्यात आली. विविध योजनाची प्रत्यक्ष शिबिराच्या ठिकाणीच आधार प्रमाणीकरण Dbt.kyc.करण्यात आलेआहे. सोबतच लोणार तहसीलच्या पुरवठानिरीक्षक आरती दांडगे यांनी पुरवठा विभागाच्या विविध योजनाची माहिती दिली.
हिरडव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी व्हि.डी.केंद्रे यांनी विधिध योजनाची दिली. यावेळी वारस प्रमाणपत्र उत्पन्न दाखले जातीचे दाखले व इतर संदर्भ सेवा या अभियानात लाभार्थ्यांना देण्यात आल्या. यावेळी दाभा ग्रामपंचायतचे सरपंच डॉ. मारोती मोरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद सुलताने,
सुभाषराव सोनुने, रामदास तनपुरे. संजय सुलताने, विजय मोरे. शिवाजी मोरे, विश्वासराव मोरे, पांडुरंग मोरे ग्रामपंचायत अधिकारी तांगडे मॅडम, ग्रामसूल अधिकारी दिगंबर गावंडे. डी. एन. जायभाये , धोत्रे, सिद्धभट्टी, कृषी विभागाने आर. जी. सास्ते, आरोग्य विभागाचे डॉ. जावेद शेख, आसाराम जायभाये, संतोष अजगर, महिला बचत गटाच्या सदस्य, महिला, युवक, नागरीक, शेतकरी व हिरडव मंडळातील बहुसंख्य नागरिक या शिबिरास उपास्थित होते.
सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी महसूल सेवक शालिकराम बाजड, ग्रामपंच्या शिपाई संदीप डव्हळे, राजू मुळे, अमोल मोरे, सदाशिव सानप यांनी परिश्रम घेतले. शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबवला जात आहे. हा काळ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाच्या औचित्या साधून निवडला गेला आहे. गांधीजींच्या सेवाभावाच्या तत्त्वज्ञानाचा आणि मोदीजींच्या विकासाभिमुख विचारांचा संगम साधणारा हा उपक्रम महाराष्ट्राच्या शासन-प्रशासनाला लोकाभिमुख, कार्यक्षम आणि अधिक पारदर्शक दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरत आहे.