बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्राहक, खातेदार, ठेवीदार, हितचिंतकांची गर्दी झाली होती.
संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लाडकी लेक गार्गीसोबत मालतीताई शेळके यांनी संस्थेच्या मुख्यालयी सकाळी केक कापला. उपस्थित कर्मचारी आणि भेटीसाठी आलेल्यांनी शुभेच्छा दिल्या. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छांचा मालतीताई शेळके यांनी विनम्रपणे स्वीकार केला. संस्थाध्यक्ष म्हणून मालतीताई शेळके प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होतात. संस्था म्हणजे आपला परिवार समजून त्यांची काळजी घेतात. प्रत्येक कर्मचाऱ्यासोबत त्यांचे घट्ट नाते निर्माण झालेले आहे. त्यामुळे आपल्या संस्थाध्यक्षांच्या वाढदिवसाला प्रत्येकजण आनंदात सहभागी होऊन भेटीला येणाऱ्यांची व्यवस्था करण्यात गुंतला होता.