* शिवसाईची दहीहंडी सर्व धर्म समभाव व एकतेचा प्रतीक देणारी : प्रा.डी.एस. लहाने
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
गोविंदा रे गोपाला या जयघोषामध्ये शिवसाई ज्ञानपीठ युनिव्हर्सल ज्ञानपीठ अजिंठा रोड स्कुलचे प्रांगण दुमदुमून निघाले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसाईच्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाच्या वेशभूषा परिधान करून विविध देखावे सादर करण्यात आले होते. सकाळपासूनच भर पावसामध्ये देखील विद्यार्थ्यांमध्ये गोपाळकाला व दहीहंडीचा उत्साह संचारला होता. पालकांनी आपल्या पाल्यांची खूप छान प्रकारे राधा, कृष्णाची वेशभूषेमध्ये तयार करून मोठ्या आनंदाने शाळेत घेऊन आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डी.एस. लहाने शिवसेना सहसंपर्क प्रमुख बुलढाणा जिल्हा यांनी भूषविले तर प्रमून पाहुण्या म्हणून सौ. मीनाताई लहाने संचालिका शिवसाई नागरी सहकारी, पतसंस्था व शिवसाई युनिव्हर्सल जु. कॉलेज चे प्राचार्य. डॉ.एस.डी. दाभाडकर तथा महिला मुस्लिम पालक अलफिया नाज सय्यद साजिद व मुस्लिम बांधव व विद्यार्थी जसे शेख सरताज व इतर अनेकांनी गोपाळकाला कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रास्ताविक मध्ये शिवसाई शाळेचे प्राचार्य प्रमोद मोहरकर यांनी एकतेचा संदेश दिला. त्याच प्रमाणे आपण सर्वांनी इतरांच्या धर्माचा आदर करावा व आपण सुशिक्षित असून योग्य व अयोग्य यांची व्यवस्थित चाळण करावी असे प्रतिपादन केले. खुप मोठ्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा प्रत्येकाने आदर राखायलाच हवा. भगवान श्री कृष्णाचे बाल सवंगडी जसे सुख दुःखांमध्ये सहभागी होत त्याच प्रमाणे शिवसाई परिवार एकतेचा नारा देत दहीहंडीचा उत्साह वाढवत थरावर थर उभारत होते. त्यामध्ये मुली देखील मागे नव्हत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.डी.एस. लहाने यांनी सर्वप्रथम बोलत असतांना गोकुळामध्ये गोपाळकाला मोठ्या उत्सहात साजरा केला जातो, हे सांगितले. तसेच भगवान श्री कृष्ण आपल्या सवंगड्याच्या सुख दुखात नेहमीच सहभागी होत असत याचा दाखला देत आपण सर्वांनी आपले नातेवाईक तसेच शेजारच्यांशी हित संबध जोपासून सुख-दु:खामध्ये सहभागी व्हावे, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रम प्रसंगी शिवसाई ज्ञानपीठ व युनिव्हर्सल येथील वर्ग नर्सरी, ज्युनियर केजी, सिनिअर केजी व वर्ग एक ते बारावीचे विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करत, नृत्य, गाणे, नाटिका सदर करून तसेच शेतकरी राजा यावर देखावे साजरे करून उपस्थित पालकांची वाहवा मिळविली व नंतर वर्ग ५ वी ते १० वी च्या विद्यार्थी व विद्यार्थिनीनी मटकी फोडून दहीहंडी उत्सव हर्ष व उल्हासात साजरा करून सर्व उपस्थितांना गोपालकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. वरूण राजाचे आगमन शेतकरी राजाला सुखावणारे असल्याने हि दहीहंडी शेतकरी राजाला समर्पित करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी उबरहंडे, दिया बारवाल, समृद्धी पवार वेदिका माळोदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी
अर्चना हिवाळे, सुरेखा रामाने, ज्ञानेश्वर मोहरकर, गोपाल आडवे व सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा खूप छान प्रकारे कार्यक्रमाची सजावट केली. यावेळी शिवसाई पतसंस्थेच्या कर्मचारी वृंदांची उपस्थिती प्रार्थनीय होती.