आता राष्ट्रीय सैनिक स्कूल या नावाने संबोधले जाणार * संस्थापक विश्वनाथ माळी व अध्यक्ष विद्याताई माळी यांची कल्पकता आली कामाला

आता राष्ट्रीय सैनिक स्कूल या नावाने संबोधले जाणार 
* संस्थापक विश्वनाथ माळी व अध्यक्ष विद्याताई माळी यांची कल्पकता आली कामाला 
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
       राष्ट्रीय सैनिकी स्कूल अजिंठा बुलढाणा महामार्गावरील राजीव गांधी मिलिटरी स्कूल या निवासी सैनिकी शाळेचे नाव बदलण्यात आले असून यापूढे सैनिकी शाळेचे नांव राष्ट्रीय सैनिक स्कूल असे संबोधले जाणार आहे. नुकतेच सदर बदलास शासनाने मान्यता प्रदान केली आहे. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था, बुलडाणा द्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूल ही निवासी सैनिकी शाळा गत 25 वर्षापासून बुलडाणा येथील अजिंठा रोडवर कोलवड परिसरात कार्यरत आहे. 
       नुकतीच भारत सरकारच्या संरक्षण विभागाने सदर सैनिकी शाळेला जोडून स्वतंत्र केंद्रीय सैनिकी शाळेस मान्यता दिली असून आता ही शाळा राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय सैनिक स्कूल आणल्याबद्दल संस्थापक विश्वनाथ माळी व अध्यक्ष विद्याताई माळी यांची कल्पकतेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एक भरीव कामगिरी होणार असून यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. कारण या राष्ट्रीय सैनिक स्कूल मुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.