साहित्यीक मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी

साहित्यीक मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
             राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे हिंदी विभागातर्फे प्राचार्य डॉक्टर अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात मुन्शी प्रेमचंद जयंतीचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. शशिकांत शिरसाठ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विजय मोरे, प्रा. डॉ. नितीन जाधव होते.
    यावेळी बोलताना डॉक्टर नितीन जाधव यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यकृतीतील ग्रामीण जीवन कसे रेखाटलेले आहे. ग्रामीण भागातील शेती शेतमजूर यांच्या जीवनातील गरिबी शोषण यावर प्रकाश टाकला.  डॉ.विजय मोरे यांनी प्रेमचंद म्हणजे हिंदी साहित्यातील एक असा साहित्यकार आहे, ज्यांनी भारतातील विविध सामाजिक समस्या आपल्या कथा, कहाणी,  उपन्यास यांचे माध्यमातून जगाच्या वेशीवर मांडल्या, असे प्रतिपादन केले. उपप्राचार्य प्रा. डॉ. शशिकांत शिरसाठ यांनी प्रेमचंद यांची तुलना इंग्रजी साहित्यातील गोरकी यांच्यासोबत करताना असे म्हटले की, प्रेमचंद यांनी मानवी जीवनातील विविध प्रथा, परंपरा, उत्सव आणि राजनीतिक बाबीवर प्रकाश टाकला, असे कथन केले.
         सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डाँ. गजानन वानखेडे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. साहिदा नसरीन यांनी केले तर आभार प्रदर्शन आदित्य चव्हाण यांनी केले.  यावेळी प्रा. डॉ.भगवान गरुडे, प्रा.डॉ. महादेव रिठे, प्रा. डॉ. स्वप्नील दांदडे, प्रा. डाँ. कामिनी मामर्डे उपस्थित होते.