* मुस्लिम समाज बांधवांची मुख्यमंत्रीयांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
उदयपुर फाईल चित्रपटावर बंदी घालण्यात यावी सोबतच मुस्लिम धर्माची, समाजाची बदनामी करणारे चित्रपट निर्माण करणाऱ्या त्या चित्रपटाचे निर्माता अमित जानी, दिग्दर्शक भारत एस. श्रीनात या दोघांवर गुन्हे दाखल करावे, असे निवेदन बुलढाणा शहरातील मुस्लिम समाज बांधव यांनी आज 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठविले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, निर्माता अमित जानी, दिग्दर्शक भारत एस. श्रीनात या दोघांनी "उदयपुर फाईल हा चित्रपट तयार केला असून लवकरच तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सद्या त्या चित्रपटाचे सोशल मिडीयावर ट्रेलर सुरु आहे, त्या चित्रपटांमध्ये मुस्लिम धर्माचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे संवाद दाखवले असल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्या आहे. तसेच या चित्रपटांमध्ये मुस्लिम धर्माची छवी ही अपमान जनक, चुकीच्या पध्दतीने दाखवलेली आहे. सदर चित्रपटामध्ये जी स्टोरी दाखवण्यात आलेली आहे. त्यममुळे हिंदु, मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे निवेदनात नमूद आहे की, शासनाने या उदयपुर फाईल चित्रपटावर बंदी घालावी, मुस्लिम समाजाची बदनामी करणारे चित्रपट निर्माण करणाऱ्या त्या चित्रपटाचे निर्माता अमित जानी, दिग्दर्शक भारत एस. श्रीनात या दोघांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, असेही नमूद आहे.
निवेदन देतेवेळी जाकीर कुरेशी, बबलु कुरेशी, मोहम्मद सोफीयान, शेख अमीन, मोहम्मद दानीश अज़हर, तारीक नदीम, शेख रफीक, शेख ईलीयास, अशफाक बागवान, शे. हमीद चौधरी यांच्यासह आदी मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.