* शिवसेना उबाठाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मलकापूर : (एशिया मंच न्युज)
शेतकर्यांना बनावट बियाणे विक्री करणार्या कृषी केंद्र मालक व कंपनीवर कायदेशीर कठोर कार्यवाही त्वरित करावी. आशा आशयाचे निवेदन शिवसेना उबाठा मलकापुर तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना आज 3 जुलै रोजी दिले.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर तालुक्यात बनावट बियाण्यांच्या विक्रीमुळे असंख्य कास्तकारांवर दुबार पेरणीचे संकट ओढल्या गेले आहे. याबाबत दिपक चांभारे पाटील मलकापुर तालूकाप्रमुख यांच्याकडे लेखी, मौखिक तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यात प्रामुख्याने दिव्यरत्न कंपनीचे सोयाबिन - फुले किमया ७५३, सोयाबीन - फुले दुर्वा ९९२, अग्रो जेनेटिक्स प्रा. लि. कंपनीचे सोयाबीन - ग्रीन लिम्का जिएलए- ५५११, सुफलाम सिड्स प्रा. लि. कंपणीचे सोयाबीन - सम्राट व ईतर बियाण्यांचा उल्लेख आहे.
मलकापूर तालुक्यातील दुबार पेरणीचे संकट ओढल्या गेलेल्या कास्तकारांच्या जमिनीचे (तहसील विभाग, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी व जि. प. कृषी अधिकारी) यांच्या मार्फत संयुक्त रित्या पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ करावे.
शेतकरी, शेतमजुर यांचा जर न्यायचा-हक्काचा प्रश्न निर्माण होत असेल तर आम्ही कदापी खपून घेणार नाही. मी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की, बनावट बियाण्यामुळे जर आपले नुकसान झाले असेल तर आमच्याशी संपर्क साधा अँड. साहेबरावजी मोरे यांच्या मदतीने कायदेशीर लढा देण्याचे ठरविले आहे, तसेच मलकापूर उबाठा शिवसेना नेहमी जनसेवेकरिता कटिबद्ध आहे, असेही दिपक चांभारे पाटील यांनी निवेदनाच्या शेवटी सांगितले.