* अन्यथा इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेचे ११ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन
बुलढाणा : (एशिया मंच न्युज)
होमिओपॅथी डॉटरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टर मध्ये करण्याचा निर्णय धोकादायक असून हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने केली आहे. अन्यथा ११ जुलै रोजी राज्यव्यावी बदं आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोबतच १९ जुलै रोजी राज्यस्तरीय मुंबई येथे मोर्चा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत ९ जुलै रोजी इंडियन मेडिकल असोशिऐशन बुलढाणा जिल्ह्याचे सचिव डॉ. गजानन व्यवहारे, सहसचिव डॉ. जे.बी. राजपूत, डॉ. विनायक उबरहंडे, डॉ. पंजाबराव हिरे यांनी सांगितले आहे.
या आयोजित पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉ. सुरेखा राजूसकर, डॉ. अरविंद राजूसकर उपस्थित होते. पत्रकार परिषदेत माहिती देतांना होमिओपॅथी डॉटरांना एमबीबीएस डॉटरांचा दर्जा देण्याला बुलढाणा येथील आयएमए संघटनेने विरोध केला आहे. महाराष्ट्र शासनाने १५ जुलै २०२५ पासून एक आदेश लागू करत, ज्या होमिओपॅथी डॉटरांनी फार्माकॉलॉजी या विषयात एक वर्षांचा ब्रिज कोर्स केला आहे, अशा डॉटरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टर मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत धोकादायक असून जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा आहे. पूर्वी दाखल केलेल्या याचिकेवरुन न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्य शासनाच्या संभाव्य निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय अजून आला नाही. अशा स्थितीत शासनाने १५ जुलै पासून अमलात येणारा नवीन आदेश काढणे म्हणजे न्यायालयाचा संभाव्य अवमान होतो. एमबीबीएस प्रशक्षित डॉक्टर हे संपूर्णपणे वैदयकीय पुराव्याधारीत उपचार पद्धती शिकतात तर बीएचएमएस डॉक्टारांचे शिक्षण पूर्णता होमिओपॅथीवर आधारीत असते. त्यांना आधुनिक औषधे शस्त्रक्रिया आपत्तकालीन व्यवस्था पाहण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत नाही. सीसीएमपी प्रशिक्षण हा एक वर्षाचा ब्रिज कोर्स आहे. जो होमीओपॅथी डॉक्टारांसाठी आखण्यात आला आहे. या कोर्समध्ये अत्यल्प प्रमाणात फार्माकॉलॉजी मेडिसीन यांचे प्राथमिक ज्ञान दिले जाते. हा कोर्स कोणत्याही प्रकारे एमबीबीएस शिक्षणाच्या साडे पाच वर्षाच्या अभ्यासक्रमास तुल्य नाही अशा डॉक्टरांना मॉर्डन मेडिसनी प्रॅक्ट्रीशनर म्हणून मान्यता दिली गेली तर सामान्य रुग्ण गोंधळात पडतील आपत्कालीन परीस्थितीत चुकीचे औषधोपचार निदान शस्त्रक्रिया अज्ञान यामुळे रुग्णांच्या जिवाला धोका होऊ शकतो. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन ८ जुलै रोजी देण्यात आले आहे. राज्यशासनाचा या निर्णयाचा तिव्र शब्दात निषेध करून या आदेशाच्या विरोधात संपूर्ण राज्यातील आयएमए च्या सर्व शाखा ११ जुलै रोजी रुग्णालय बंद ठेऊन राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे. अशी माहिती आयएमएच्या पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.